Sohail Khan Video: रस्त्यात विव्हळत पडलेल्या महिलेच्या मदतीला धावला सलमान खानचा भाऊ, लोक म्हणाले...

सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका महिलेला मदत केल्यामुळे सोहेल चर्चेत आला आहे.
Sohail Khan Video
Sohail Khan VideoDainik Gomantak

अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात ज्यामध्ये ते चाहत्यांशी गैरवर्तन करताना दिसतात. बॉलिवूड स्टार्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, यात एक स्टार रस्त्यात विव्हळत पडलेल्या महिलेला मदत करत आहे.

सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका महिलेला मदत केल्यामुळे सोहेल चर्चेत आला आहे.

Sohail Khan Video
Kantara Prequel : कांतारा2 लवकरच येणार? निर्मात्याने केली मोठी घोषणा.. बजेटही असणार प्रचंड मोठं

बॉलिवूड स्टार सलमान खानचा भाऊ, अभिनेता सोहेल खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्यावर पडलेल्या महिलेला पाहून सोहेल खूपच अस्वस्थ झालेला दिसत आहे.

तो त्या महिलेला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सोहेल कॅज्युअल लूकमध्ये आहे.

Sohail Khan Video
Kangana Ranuat On Emergancy: "इमर्जन्सी चित्रपटासाठी मला संपत्ती गहाण ठेवायला लागली" कंगनाने सांगितला अनुभव

जमिनीवर पडलेल्या महिलेला जेव्हा सोहेल खान आणि इतरांनी उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला म्हणाली, 'तुम्ही कसे उचलणार? माझे पाय दुखत आहे.' यादरम्यान सोहेलसोबत इतर अनेक लोकही महिलेला मदत करताना आणि तिला उचलून गाडीत बसवताना दिसत आहेत.

अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना चाहते सोहेलचे कौतुक करताना दिसत आहेत.

सोहेल खानच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'सोहेल खान विथ गोल्डन हार्ट.' दुसऱ्याने लिहिले की, 'तो खूप चांगला मनाचा माणूस आहे.' एकाने त्याला जेंटलमन म्हटले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट इमोजी बनवून अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com