चित्रपट निर्मात्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, मात्र ...

priyanka chopra.jpg
priyanka chopra.jpg

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री ओप्रा विन्फ्रेच्या 'सुपर सोल' या कार्यक्रमामध्ये दिसली. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर खुलासे केले आहेत. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने तिच्या लग्नापासून ते जीवनातील इतर अनेक पैलूंवर उघडपणे चर्चा केली आहे. शिवाय या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील तिच्या सुरुवातीच्या काळाविषयीची अनेक रहस्ये उघड केली आहेत. सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्याकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती आणि त्यावर तेव्हाच आवाज न उठवल्याने आपल्याला आजही दुःख होत असल्याचे प्रियांकाने संगितले आहे. (Priyanka Chopra said that The filmmaker had abused me)

हॉलिवूड मधून बॉलिवूड मध्ये आलेल्या मी-टू चळवळीमुळे अनेक अभिनेत्रींनी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींवर आरोप केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यातच आता प्रियांका चोप्राने देखील चित्रपट क्षेत्रातील शोषणाबद्दलचा मुद्दा उपस्थित केला आहे. सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गैरवर्तन केले होते आणि त्यावर आपण तेव्हाच आवाज उचलला नसल्याने या गोष्टीचा आजही आपल्याला पश्चाताप होत असल्याची भावना  प्रियांका चोप्राने व्यक्त केली आहे. या क्षेत्रातला तो आपला सुरुवातीचा काळ असल्याने आपण खूप घाबरलो होतो, असेही तीने पुढे सांगितले आहे. 

(चित्रपट निर्मात्याचे नाव न घेता) चित्रपटाच्या सेटवर एका निर्मात्याने आयटम सॉंगच्या डान्ससाठी कपडे उतरवण्यास सांगितले असल्याचा मोठा खुलासा प्रियांका चोप्राने केला. आणि त्यानंतर या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी आपण हा चित्रपट सोडला असल्याची माहिती तिने या कार्यक्रमात दिली. प्रियांकाच्या उत्तरावर ओप्रा विन्फ्रेने चित्रपट सोडण्याचा कठोर निर्णय कसा घेतला? असे विचारले.  त्यावर प्रियांकाने आपल्या आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. आणि त्यांच्यामुळेच अशी हिमंत करता आल्याचे पुढे सांगितले.     (Priyanka Chopra said that The filmmaker had abused me)

याव्यतिरिक्त, त्याकाळात चित्रपट क्षेत्रात आपण नवीन असल्याने फार भीती वाटली होती, असे प्रियंकाने पुढे सांगितले. असे म्हटले जाते की, मुली आदर आणि सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करत नाहीत, मात्र आपल्याला त्यासाठीचा संघर्ष करायचा होता. व त्यामुळेच आज आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे प्रियांका चोप्राने सांगितले. तसेच या सर्व वाईट गोष्टींपासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या गोष्टींपासून दूर राहणे, असेही प्रियंकाने सांगितले. इतकेच नाही तर, "आईने सांगितले होते की, आयुष्यात काहीही करा पण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे लागेल.'' आणि म्हणूनच आपण या ठिकाणी असल्याचे मत प्रियांकाने व्यक्त केले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com