Gadar 2 Box Office Collection: पहिल्याच दिवशी 'गदर 2' ची बंपर कमाई, शाहरुखच्या 'पठाण'ला जोरदार टक्कर

'गदर 2' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे
Gadar 2
Gadar 2 Dainik Gomantak

Gadar 2 Box Office Collection: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 'गदर 2' 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते प्रतिक्षा करत होते. याची एक झलक बॉक्स ऑफिसवर देखील पाहायला मिळाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी 'गदर 2' चांगली कमाई करून या शाहरुख स्टारर 'पठाण'ला टक्कर दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया अनिल शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाची कमाई किती केली आहे.

  • पहिल्या दिवशी 'गदर 2' ची बंपर कमाई

सिनेप्रेमींसाठी हा शुक्रवार खूप खास होता. कारण या दिवशी बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'गदर 2' आणि OMG सारख्या दोन मोठ्या आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सिक्वेल रिलीज झाले आहेत. 'गदर 2' ची पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

Gadar 2
Jailor Movie Release: थलैवा रजनीकांतचा 'जेलर'ठरला भारी! पहिल्याच दिवशी नोंदवला 'हा' विक्रम
  • 'पठाण' नंतरचा वर्षातील दुसरा सर्वात मोठा चित्रपट


'गदर 2' पठाणनंतर पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत वर्षातील दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खान स्टारर 'पठाण' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर सनी देओल स्टारर 'गदर 2' ने पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर हा वर्षातील दुसरा मोठा ओपनर चित्रपट मानला जात आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये रिलीज झाला होता. याच चित्रपटाचा सिक्क्वेलही त्यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारचा OMG2 देखील चित्रपट रिलीज झाला असून सर्वांचे लक्ष आता याकडे लागले आहे की कोणता चित्रपट किती कमाई करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com