
अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बू, अक्षय खन्ना, श्रेया सरन यांसारख्या दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. सस्पेन्स-क्राइम थ्रिलर चित्रपट 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. आत्तापर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला 6 दिवस पूर्ण झाले असले तरी त्याची कमाई सुरूच आहे. सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.
अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'दृश्यम 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळेच या चित्रपटाची बजेटपेक्षा अधिक कमाई सुरुच आहे. एवढेच नाही तर 'दृश्यम 2' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपटाच्या (Movie) कमाईवर एक नजर टाकल्यास, 'दृश्यम 2'चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. दुसरीकडे, चित्रपटाचे कलेक्शन दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट होते आणि त्याने 21.59 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली.
दुसरीकडे, चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला आणि त्याने 11.87 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाईही चांगली झाली आहे. 'दृश्यम 2' ने 5 व्या दिवशी 10.48 कोटी रुपयांची कमाई केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.