Crakk Trailer:...अन् विद्युत म्हणाला- 'आमच्याकडेपण सिंघम, सिम्बा, सूर्यवंशी सगळे एकत्रच येतात'

Crakk Trailer: या चित्रपटातील निगेटिव्ह भूमिकेतील अर्जुन रामपाललाही लोक पसंत करत आहेत.
Crakk Trailer
Crakk TrailerDainik Gomantak

Crakk Trailer: विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल स्टारर हाय व्होल्टेज ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'क्रॅक'चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स अतिशय रोमांचक आहेत. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स पाहिल्यानंतर चाहते विद्युतचे जोरदार कौतुक करत आहेत. विद्युत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ॲक्शनसोबत कॉमेडी करताना दिसत आहे आणि लोकांना त्याची स्टाइल खूप आवडली आहे. या चित्रपटातील निगेटिव्ह भूमिकेतील अर्जुन रामपाललाही लोक पसंत करत आहेत.

'क्रॅक' चित्रपटात ॲक्शनसोबतच कॉमेडीही पाहायला मिळत आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांच्या जबरदस्त ॲक्शनसोबतच एमी जॅक्सन आणि नोरा फतेहीही दिसत आहेत. 2 मिनिट 21 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात या संवादाने होते, 'ए भाई, सपने तो दोनों आँखों से देखते हैं ना और तेरी दूसरी आँख कौन है..मैं तो हूं. त्यानंतर चित्रपटात विद्युतच्या भावाचा मृत्यू होतो आणि अॅक्शन चित्रपटाला सुरुवात होते. ही सूडाची कहाणी असल्याचे स्पष्ट आहे. विद्युतला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.

ट्रेलरच्या शेवटी, विद्युतचा एक डायलॉग आहे, ज्यामध्ये तो म्हणतोय - खूप छान आहे, आमच्याकडेपण सिंघम, सिम्बा, सूर्यवंशी हे सगळे एकत्रच येतात. ॲक्शन गर्लच्या भूमिकेत एमी जॅक्सन किलर दिसत आहे. याबरोबरच नोरा फतेहीदेखील या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. जबरदस्त अॅक्शन आणि त्याच्या जोडीला तितकेच दमदार म्युझिक यांच्यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी 'आशिक बनाया', 'अपने', 'टेबल नंबर 21' ते 'करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' सारखे चित्रपट आणि वेब सीरीज बनवल्या आहेत. हा चित्रपट विद्युतच्या होम प्रोडक्शन ॲक्शन हिरो फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. आता हा ट्रेलरप्रमाणेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com