Poonam Pandey Passed Away: प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेचे निधन, कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचा दावा

Poonam Pandey Passed Away Due To Cancer | पूनम पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Poonam Pandey Passed Away Due To Cervical Cancer
Poonam Pandey Passed Away Due To Cervical CancerDainik Gomantak

Poonam Pandey Passed Away:

बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले आहे. पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. पूनम पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या सोशल मिडिया टीमने मृत्यूबाबत माहिती दिली आहे.

32 वर्षीय पूनमचे अचानक निधन झाल्याने बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Poonam Pandey Passed Away Due To Cervical Cancer
Relationship Tips: जोडीदार इग्नोर करत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

“आजची सकाळ आमच्यासाठी दुःखद होती. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपल्या लाडक्या पूनमचे निधन झाले आहे. तिला भेटलेले प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करत असे.” असे पूनम पांडेच्या मृत्यू बाबत माहिती देणाऱ्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

पूनम पांडेच्या अकाऊंटवरील या पोस्टवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी ही पोस्ट खोटी असावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.

पूनम पांडे एक प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 क्रिकेट विश्वचषक भारत जिंकल्यास ती अंगावरील कपडे काढून टाकेल असे फायनलपूर्वी तिने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते. याकाळात तिची लोकप्रियता गगनाला भिडली होती.

दरम्यान, तिच्या या वक्तव्यामुळे ती पहिल्यांदाच वादात देखील सापडली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडे शेवटची कंगना राणौतच्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.

पूनमने सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते हे लग्न देखील अनेक कारणांनी चर्चेत राहिले. सॅम पूनमचे लग्न सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. 2020 मध्ये लग्नानंतर तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com