Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या
Mumbai University
Mumbai University Dainik Gomantak

Mumbai University Exams मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यानं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवारपासून सुरु होणार आहेत.

3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. तर पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून पार पडतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. या परीक्षा आता परीक्षा 6 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार आहेत. mu.ac.in या संकेतस्थळावर राहिलेल्या दोन तारखांच्या (3 आणि 4 फेब्रुवारी) पेपर्सचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

Mumbai University
BMC Budget: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 4 अँटिलियासारखी...

शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदांच्या भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांमुळे परीक्षेशी संबंधित सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठाने गुरुवारी एलएलबी, एलएलएम, एमए, एमएससी, एमकॉम आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com