Maharashtra: जाणून घ्या मराठी भाषा गौरव दिन आज का साजरा केला जातो ?

Maharashtra: मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिनDainik Gomantak

Maharashtra: मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2021रोजी घेतला होता.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एकनाथ शिंदेंनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी सभागृहात केली आहे.

मराठी भाषेबद्दल बोलताना पु.ल. देशपांडे यांनी म्हटले होते. पुंडलिक वरदा म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक , हारी विठ्ठल तुमच्या तोंडून येणारच. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो.

मराठी भाषा गौरव दिन
Maharashtra Assembly Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

अशा नेणिवांतून, आपोआप उमटल्या जाणाऱ्य प्रतिक्रियांतूनच समाजमानस तयार होत असतो. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप जय येत नाही तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही .

अशा प्रकारे मराठी भाषेशिवाय मराठी माणूस अपूर्ण असल्याची भावना पु. ल. देशपांडेंनी आपल्या लेखणातून व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com