Devendra Fadnavis: पहाटेच्या शपथविधीबाबत सगळ्या गोष्टी समोर आणणार

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Dainik Gomantak

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून अलीकडे दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे सूचक वक्तव्य केले आहे. या प्रकरणा हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोलो तेच कसं खरं होत आहे, हे हळूहळू समजेल.

Devendra Fadanvis
Board Exam: 12 वीच्या परिक्षेत पून्हा गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहीत होते का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रपती राजवट उठली.

जर राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

Devendra Fadanvis
CM Pramod Sawant In Kolhapur: ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब- सावंत

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीबद्दलच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्हाला अर्धी माहिती मिळाली आहे, मी काही बोलतो त्यावर समोरून दुसरी गोष्ट समोर येते. आता हळुहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतील."

आदित्य ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस हे आमचे मित्रच आहेत, या वक्तव्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, ''महाराष्ट्रात एक संस्कृती आहे, ज्यात फक्त वैचारिक विरोधक असतात. अलीकडच्या काळात आपल्याला शत्रुत्व पाहायला मिळत आहे.

मात्र ते योग्य नाही, हे कधीतरी संपवायला लागेल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, आम्ही वैचारिक विरोधक आहोत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com