कोकणातील गणेश भक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय, कोकणातील प्रवास होणार आणखी सुखर

गणेशोत्सव
गणेशोत्सवDainik Gomantak
Published on
Updated on

कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखर व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध केला आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने जड वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केलाय. 23 ऑगस्ट रोजी याबाबतचा निर्णय जारी केला आहे.

गणेशोत्सव
Maharashtra: शिंदे सरकारची कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त मोठी भेट!

गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र.जुना क्र.17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे.

गणेशोत्सव
GCA: गोव्याच्या प्रशिक्षकपदी मन्सूर अली

- 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 01 वाजेपासून ते 10 सप्टेंबरला रात्री 08 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर वाळू/रेती व तत्सम गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे.

- दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण/रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

गणेशोत्सव
Goa Corona Update: गोव्यात 1040 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 159 नव्या रूग्णांची नोंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com