Mumbai: १० वर्षांच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: पालकांनी सांगितले की, त्यांची मुले शाळा आणि शिकवणीसाठी घरातून निघून गेल्यावर काय करतात याची त्यांना काही कल्पना नसते.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsDainik Gomantak

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 10 वर्षांच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ही बाब बुधवारी पहिल्यांदा समोर आली जेव्हा पीडित मुलाला खुर्चीवर बसण्यात अडचण येत होती, जी शेजारच्या महिलेच्या लक्षात आली. त्या महिलेने मुलाच्या पालकांना याबद्दल सांगितले आणि पालकांनी मुलाला विचारले तेव्हा त्याने भयानक गोष्टी उघड केल्या.

घाबरलेल्या आणि संतप्त झालेल्या पालकांनी पंत नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांना सर्व घटना सांगितली.

मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या शाळेतील तीन मुले, जे त्याच्या शेजारी राहतात, त्यांनी पीडित मुलाला त्यांच्या घरी आणले, जिथे त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हे जवळजवळ एक महिन्यापूर्वी सुरू झाले आणि मुलांनी कथितपणे प्रथम फक्त पीडितेचे कपडे उतरवले, आणि नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडित मुलाच्या पालकांच्या लक्षात आले की, त्यांच्या मुलाच्या वागणुकीत बदल झाला आहे, तो एकटा एकटा राहायचा, त्याचे जेवन कमी झाले होते आणि त्याने घरच्यांशी बोलणेही कमी केले होते. परंतु पालकांनी असे गृहीत धरले की हे शैक्षणिक तणावामुळे झाले असेल.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले आणि त्यानंतर घाटकोपरमध्ये त्यांच्या परिसरात एक पथक तैनात करण्यात आले. 12, 15 आणि 16 वर्षे वयोगटातील तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.

त्यांच्या पालकांनी सांगितले की, त्यांची मुले शाळा आणि शिकवणीसाठी घरातून निघून गेल्यावर काय करतात याची त्यांना काही कल्पना नसते आणि ते कामासाठी बाहेर पडतात, ही मुले सहसा शाळेच्या वेळेनंतर एकत्र फिरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com