Goa Today's News: विकसित गोवा 2047! 7.20 कोटींचे बोस्टनला दिलेले कंत्राट रद्द

Goa Today's News: विकसित गोवा 2047! 7.20 कोटींचे बोस्टनला दिलेले कंत्राट रद्द

Goa Today's 20 July 2024 Breaking News In Marathi: पावसाचा रेड अलर्ट, गुन्हे, पर्यटन, राजकारण यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
Published on

विकसित गोवा 2047! 7.20 कोटींचे बोस्टनला दिलेले कंत्राट रद्द

विकसित गोवा 2024 डॉक्युमेंट तयार करण्यासाठी बोस्टन कंस्टल्टिंग ग्रुपला दिलेले 7.20 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्यात आले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी विधानसभेत अर्थसंल्पावर बोलताना सरकारच्या या वर्क ऑर्डरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सरकारनं आश्वासन पाळलं, विमल शिरोडकरांना दोन लाखांची मदत!

अतिरिक्त जिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी विमल शिरोडकर यांना दोन लाखांचा धनादेश सुपूर्द केला, ज्यांच्या घराचं काही दिवसांपूर्वी नुकसान झालं होतं. सरकारनं मदत देण्याचं आश्वासन पाळलं.

Congress state president Amit Patkar: मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेऊ नये!

सभागृहातील प्रश्नांवर आणि मुद्यांवर मुख्यमंत्री अजिबात गंभीर नाहीत. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेणे मुख्यमंत्र्यांनी कृपा करुन बंद करावे. अशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अमित पाटकरांनी केली.

Goa News: धोकादायक हळदोणा मार्केट इमारतीतील दुकानदारांना नोटीसा

धोकादायक स्थितीत असलेल्या हळदोणा मार्केट इमारतीमधील दुकानदारांना तात्काळ दुकाने खाली करण्याची पंचायतीची नोटीस जारी. प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमदार कार्लुस फरेरांचे आवाहन.

Congress state president Amit Patkar: मोपा 'लिंक रोड' हा एक मोठा घोटाळा!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मोपा लींक रोड हा एक घोटाळा. ‌कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला. DBOT (Design, Build, Operate, Transfer ) तत्वावरील मोपा विमानतळाच्या मुख्य आराखड्यात लिंक रोडचा समावेश का नाही? असा सवालही यावेळी पाटकरांनी केला. याशिवाय त्यांनी लिंक रोडवरील टोल रद्द करण्याचीही मागणी‌ केली.

Goa Crime News: कोळंब-पाकोळे येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

कोळंब-पाकोळे येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

खाण खंदकातून पंपिंगद्वारे पाणी सोडणे सुरु!

लामगावच्या माथ्यावरील खाण खंदकातून पंपिंगद्वारे पाणी बाहेर सोडणे सुरु. 'रेड अलर्ट' असतानाही पाणी डिचोलीतील नदीला जोडणाऱ्या नाल्यात सोडले जातेय. शहरवासीय भयभीत.

DGP Alok Kumar: नवे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांची कोलवा पोलीस ठाण्याला भेट

नवे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांची कोलवा पोलीस ठाण्याला भेट. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेला सहकार्य करण्याविषयी सांगितले. लवकरच कोलवा पोलीस ठाण्यासाठी जमीन संपादित करण्यात येणार. एसपी सुनिता सावंत यांनी सांगितले.

DGP Alok Kumar: DGP अलोक कुमार यांची मडगावातील पोलीस मुख्यालयाला भेट!

गोव्याचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांची मडगावातील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षेसह वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Goa Miles Taxi Services: आमचा व्यवसाय हिरावून घेतला, कोलवातील टॅक्सी चालकांचा दावा

कोलवातील टॅक्सी चालकांनी बीच परिसरात व्यवसाय करत असलेल्या गोवा माइल्स टॅक्सी सेवेच्या संदर्भात कोलवा पोलीस निरीक्षकांची घेतली भेट. ॲप आधारित या टॅक्सी सेवेमुळे त्यांचा व्यवसाय हिरावून घेतल्याचा टॅक्सी चालकांकडून दावा.

MLA Vijay Sardesai: मंत्री खंवटेंना मी मिठी मारलेली नाही! आणि मिठी मारल्याने काही फरक पडणार नाही

मंत्री रोहन खंवटेंना मी मिठी मारलेली नाही. आणि मिठी मारल्याने काहीही फरक पडणार नाही. सरकारचे पितळ उघडे पाडण्याचे काम माझ्याकडून सुरुच राहील. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंचे प्रतिपादन.

BJP MLA Rajesh Faldessai: ओल्ड गोव्यात 'मिनी सनबर्न' होणार? आमदार फळदेसाई आग्रही

शक्य झाल्यास मी ओल्ड गोवा हॅलीपॅडवर 'मिनी सनबर्न' आणणार आहे. आमच्या मुलांना दक्षिण गोव्यात एवढ्या दूर जाण्याचा त्रास टळेल. मिनी सनबर्न आम्हाला करायला मिळेल याची मला आशा आहे. पूर्ण खबरदारी बाळगून आयोजन केल्यास सनबर्नमध्ये ड्रग्ज दूर ठेवणे शक्य. कुंभारजुवेचे भाजप आमदार राजेश फळदेसाईंचे वक्तव्य.

Asgaon house demolition case: पूजा शर्माला हायकोर्टाचा दिलासा!

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर. चौकशीस 22 जुलैला एसआयटी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचा आदेश. अटक केल्यास 50 हजार रु. च्या वैयक्तिक हमीवर सुटका करण्याचे तसेच पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचा व न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाण्याची अट.

Union Home Minister Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांनी लावली हजेरी. दहशतवादी नेटवर्क आणि इको सिस्टिम नष्ट करण्यासाठी सर्व एजन्सींच्या समन्वयावर भर. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारचा दृष्टीकोन स्वीकारण्याचे निर्देश.

Goa Orange Alert: गोव्यात पावसाचं थैमान! हवामान खात्याकडून पाच दिवस 'ऑरेंज अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता!

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, 21, 22, 23 आणि 24 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

रस्ता खचला, ट्रक रुतला

बागा येथील टीटोज लेनकडे जाणारा रस्ता खचल्याने सांडपाणी वाहून नेणारा ट्रकची रुतला.

Goa Police: दारुड्या, जुगारी पोलिसांवर होणार कारवाई; गोवा डिजीपींचा एसपींना महत्वाचा आदेश

पोलिस स्थानकात दारुचे सेवन करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई. पोलिस स्थानकांमध्ये अचानक भेटी देण्याचा डीजीपींचा एसपींना आदेश. तसेच अशा पोलिसांची यादी तयार करण्याचाही दिला निर्देश.

Bicholim: डिचोली-साखळी रस्त्यावर ट्रक बंद, वाहतुकीस अडथळा

डिचोली-साखळी रस्त्यावर गोकुळवाडा-सर्वण येथे मालवाहू ट्रक बंद. अपघातप्रवण धोकादायक वळणावर मध्येच ट्रक बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा. वाहनचालकांचा उडतोय गोंधळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com