Photo Viral: रोहितसह जयस्वालही इंग्लंडला रवाना! WTC फायनलसाठी टीम इंडियात सामील

टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी रोहित शर्मासह यशस्वी जयस्वाल इंग्लंडला रवाना झाला आहे.
Yashasvi Jaiswal | Rohit Sharma
Yashasvi Jaiswal | Rohit Sharma Dainik Gomantak

Yashasvi Jaiswal travels to England With Rohit Sharma for WTC Final: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामन्याची धामधूम सुरू असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रविवारी रात्री इंग्लंडला रवाना झाले.

भारतीय क्रिकेट संघाला 7 ते 11 जून दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ गेल्या आठवड्यातच इंग्लंडला पोहचला आहे. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे.

आता रविवारी (28 मे) रात्री रोहित आणि जयस्वाल हे देखील इंग्लंडला रवाना झाले आहेत. दरम्यान, जयस्वालचा यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात समावेश नव्हता.

Yashasvi Jaiswal | Rohit Sharma
Ambati Rayudu Retire: IPL 2023 फायनलमध्ये अखेरचा खेळणाऱ्या रायुडूने CSK आणि MI साठी कधी जिंकल्यात ट्रॉफी? जाणून घ्या

मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश असलेला ऋतुराज गायकवाड 3-4 जून दरम्यान लग्न करणार आहे. त्यामुळे तो 5 जून नंतर इंग्लंडला जाण्यासाठी उपलब्ध होता. त्याचमुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या बदली खेळाडूची मागणी निवड समितीकडे केली होती. त्यानुसार ऋतुराजच्या जागेवर जयस्वालची राखीव खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली.

दरम्यान, माधम्यांमध्ये हे वृत्त आले असले, तरी अद्याप बीसीसीआयने याबद्दल पुष्टी केलेली नाही. मात्र, जयस्वालने रोहितबरोबर कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जातानाचा फोटो पोस्ट केल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

जयस्वालने गेल्या काही महिन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून दरमदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने आयपीएल 2023 मध्ये सर्वात जलद अर्धशतकही ठोकले.

Yashasvi Jaiswal | Rohit Sharma
Ruturaj Gaikwad Post: ऋतुराजने शेअर केलेल्या फोटोमधील ती 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण? चर्चेला उधाण

त्याने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून 625 धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 5 सामन्यांमध्ये 404 धावा केल्या होत्या.

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांचाही समावेश आहे.

असा आहे मुख्य भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com