World Table Tennis: हरमीत, सुतिर्था, यशस्विनीची आगेकूच

मुख्य फेरीतील लढतींना उद्यापासून सुरवात
World Table Tennis
World Table TennisDainik Gomantak
Published on
Updated on

World Table Tennis star contender Goa 2023 : वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेत पात्रता फेरीचा अडथळा पार करून भारताच्या हरमीत देसाई, सुतिर्था मुखर्जी व यशस्विनी घोरपडे यांनी एकेरीत मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेच्या मुख्य फेरीतील लढतींना बुधवारपासून (ता. 1) ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात होईल. पुरुष व महिला एकेरी-दुहेरी, मिश्र दुहेरीतील सामने रविवारपर्यंत (ता. 5) खेळले जातील.

World Table Tennis
IND vs AUS: इंदूर कसोटीत पुजारा करणार 'हा' महारेकॉर्ड, विराट-रोहितही भारतासाठी...
World Table Tennis
World Table TennisDainik Gomantak

युवा खेळाडू यशस्विनी हिने मुख्य फेरीत प्रवेश करताना दोन मातब्बर कोरियन खेळाडूंना हरविले. स्पर्धेतील भारताची युवा खेळाडू यशस्विनी सध्या जागतिक क्रमवारी १९६व्या स्थानी आहे.

तिने अगोदर १०३व्या क्रमांकावरील चेओनहुई जू हिला ३-१ (११-७, ११-६, ९-११, ११-८) असे, तर नंतर १०४व्या क्रमांकावरील नायेओंग किम हिला अटीतटीच्या लढतीत ३-२ (११-६, १-११, ५-११, ११-५, ११-७) असे हरविले.

``स्टार कंटेंडर स्पर्धेसाठी मी प्रथमच पात्रता मिळविली आहे, साहजिकच खूप खूष आहे. दर्जेदार खेळाडूस हरविल्यामुळे अनुभवात खूप भर पडली असून या कामगिरीचे श्रेय मी प्रशिक्षक व पालकांना देत आहे,`` असे यशस्विनी सामन्यानंतर म्हणाली. यशस्विनी कर्नाटकातील बंगळूर येथील आहे.

मुख्य फेरीत तिच्यासमोर जपानची ३८व्या क्रमांकावरील मियू नागासाकी हिचे कडवे आव्हान असेल.

World Table Tennis
Women's T20 World Cup मधील पराभवानंतरही टीम इंडिया फायद्यात, या मोठ्या स्पर्धेसाठी...
World Table Tennis
World Table TennisDainik Gomantak

सुतिर्थाचा धडाकेबाज खेळ

जागतिक क्रमवारीत १४७व्या स्थानी असलेल्या सुतिर्था मुखर्जी हिने पात्रता फेरीत धडाकेबाज खेळ केला. दुसऱ्या फेरीत तिने तैवानची ९२व्या क्रमांकावरील ली यू-झून हिचा ३-० (११-९, ११-८, ११-६) असा धुव्वा उडविला. नंतर कोरियाची १०७व्या क्रमांकावरील युनहे ली हिला ३-१ (११-९, ६-११, ११-६, ११-८) असे नमविले. राऊंड ऑफ १६ मध्ये ती भारताचीच सुहाना सैनी हिच्याविरुद्ध खेळेल.

हरमीतचा झुंजार खेळ

सूरत येथील २९ वर्षीय हरमीत देसाई याला पुरुषांच्या पात्रता फेरीत जोरदार टक्कर द्यावी लागली. झुंजार खेळ करत त्याने दोन्ही लढती ३-२ फरकाने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही वेळेस त्याने निर्णायक पाचव्या गेममध्ये खेळ उंचावला.

पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत हरमीतने अर्जेंटिना ८४व्या क्रमांकावरील होरासियो सिफुएन्तेस याला ११-७, ९-११, ११-७, ८-११, ११-५ असे नमवून आगेकूच राखली. त्यापूर्वी त्याने जर्मनीचा ९९व्या क्रमांकावरील फँगबो मेंग याला ५-११, १३-११, ९-११, ११-९, ११-९ असे नमविले होते.

``दोन्ही सामने खूपच खडतर होते, त्यामुळे जास्त प्रेरणा मिळाली. उपस्थितांचे प्रोत्साहनही निर्णायक ठरले. यापूर्वी मी होरासियो याच्याविरुद्ध पराभूत झालो होतो, त्यामुळे यावेळच्या सामन्यापूर्वी विशेष नियोजन आखले होते, जे सार्थकी लागल्याचा आनंद आहे. हाच फॉर्म मुख्य फेरीतही कायम राखायचा आहे,`` असे हरमीतने सांगितले.

World Table Tennis
World Table TennisDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com