World Cup 2023: बाबर आझम मोडणार कोहलीच्या 50 शतकांचा रेकॉर्ड, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा

World Cup 2023: न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून वनडे फॉरमॅटमधील 50 वे शतक पूर्ण केले.
Kamran Akmal & Virat Kohli
Kamran Akmal & Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

रविवारी 19 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून वनडे फॉरमॅटमधील 50 वे शतक पूर्ण केले.

यासह तो या बाबतीत सचिन तेंडुलकरच्याही पुढे गेला. विराटच्या या नव्या विक्रमावर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने मोठा दावा केला आहे.

कामरान अकमलचा दावा

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा (Virat Kohli) 50 शतकांचा विक्रम पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम मोडू शकतो, असा विश्वास पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने व्यक्त केला आहे. अकमलच्या मते, अव्वल तीनमध्ये फलंदाजी करणारा फलंदाजच विराटचा वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडू शकतो.

Kamran Akmal & Virat Kohli
World Cup 2023: रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 नसून 46 असायला हवा होता, असं का म्हणाले माजी आयपीएस?

अकमल म्हणाला की, ''तो (विक्रम) फक्त टॉप-3 खेळाडूच मोडू शकतात. मधल्या फळीतील फलंदाजाला मोडता येणार नाही. आमच्याकडे बाबर आझम आहे, तो ही कामगिरी करु शकतो. तो टॉप-3 मध्ये खेळतो. त्यांच्याकडे सध्या शुभमन गिल आहे, तो या विक्रमापर्यंत जाऊ शकतो.''

Kamran Akmal & Virat Kohli
World Cup 2023: रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 नसून 46 असायला हवा होता, असं का म्हणाले माजी आयपीएस?

दुसरीकडे, बाबर आझमने (Babar Azam) पाकिस्तानसाठी आतापर्यंत 117 वनडे सामन्यांमध्ये 19 शतके झळकावली आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची खराब कामगिरी आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर बाबरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने नऊ पैकी चार एकदिवसीय सामने जिंकले, तर पाचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com