Captain Announced: केएल राहुलच्या IPL टीमने केली मोठी घोषणा, 'या' खेळाडूला बनवले कर्णधार

Lucknow Franchise: महिला प्रीमियर लीगचा (WPL) उद्घाटन हंगाम 4 मार्चपासून सुरु होणार आहे. याआधी सर्व फ्रँचायझी आपापल्या कर्णधारांची घोषणा करत आहेत.
KL Rahul
KL Rahul Dainik Gomantak

Women's Premier League, Lucknow Franchise: महिला प्रीमियर लीगचा (WPL) उद्घाटन हंगाम 4 मार्चपासून सुरु होणार आहे. याआधी सर्व फ्रँचायझी आपापल्या कर्णधारांची घोषणा करत आहेत.

पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) फ्रँचायझीने आपल्या महिला संघाच्या कर्णधाराची घोषणा केली. आता लखनौ फ्रँचायझीनेही आपल्या महिला संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

केएल राहुल (KL Rahul) लखनौ सुपरजायंट्सचे कर्णधारपद सांभाळतो, या फ्रँचायझीचा पुरुष संघ. राहुल सध्या भारतीय कसोटी संघाचा भाग आहे.

यूपी संघाने कर्णधाराची घोषणा केली

पुढील महिन्यात मुंबईत (Mumbai) होणाऱ्या उद्घाटन महिला प्रीमियर लीग (WPL) साठी यूपी वॉरियर्सने स्टार ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज एलिस हिलीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या यूपी वॉरियर्स संघाने फ्रँचायझी आधारित लीगसाठी संतुलित संघ बनवला आहे.

हीली महिला क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय चेहरा आहे. ती खूप अनुभवी देखील आहे. तिने ऑस्ट्रेलियासाठी 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जवळपास 2,500 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

KL Rahul
Women Premier League: लखनौ फ्रँचायझीचे नवे नाव आले समोर, लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय

यूपी वॉरियर्स संघ शानदार आहे

एलिस हीलीची (Alyssa Healy) गणना महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये केली जाते. तिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 110 बळी घेतले आहेत. यावर हिलीने आनंद व्यक्त केला.

हिली म्हणाली की, 'ऐतिहासिक डब्ल्यूपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात यूपी वॉरियर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने मला आनंद होत आहे. आम्ही सर्वजण डब्ल्यूपीएलची आतुरतेने वाट पाहत होतो. विशेष म्हणजे, यूपी वॉरियर्स संघ शानदार आहे. मी स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.'

KL Rahul
Premier League: अभिमानास्पद! भूपेंदर सिंग बनले प्रीमियर लीग इतिहासातील पहिले शीख असिस्टंट

टीम: एलिसी हिली (क), सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल आणि लॉरेन बेल सिमरन शेख.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com