जॉय काकोडकरने बुद्धिबळात विजेतेपद पटकावले

स्वेरा ब्रागांझा (Svera Braganza) उपविजेती ठरली. तिने साडेपाच गुण नोंदविले. लव्ह काकोडकर याने पाच गुणांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला.
Joy Kakodkar
Joy KakodkarDainik Gomantak

पणजी: जॉय काकोडकर (Joy Kakodkar) याने सात डावात अपराजित राहत तिसवाडी तालुका खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्याने साडेसहा गुणांची कमाई केली. स्वेरा ब्रागांझा (Svera Braganza) उपविजेती ठरली. तिने साडेपाच गुण नोंदविले. लव्ह काकोडकर याने पाच गुणांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी हिंदू वाचन मंदिरात झाली. बाळकृष्ण शिवा पै आंगले यांच्या स्मरणार्थ

Joy Kakodkar
गोव्याच्या कर्णधारपदासाठी एकनाथ आघाडीवर

आंगले कुटुंबीयांतर्फे स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती. प्रतीक बोरकर, वेदांत आंगले, आर्या दुबळे, श्रेयश हवाल, वरद शिरोडकर, ऐडेन सावियो ग्रावो, के. तुषार यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला. 7 ते 13 वर्षांखालील मुलगे व मुलींत अनुक्रमे आदित्य दुबळे, विहान तारी, आर्यन बॅनर्जी, एथन सिल्वेरा, नॅथन फाचो, लिया सिल्वेरा, मृगजा सरदेसाई, रेडन फ्रँक, धर्मदित्य नाईक, श्रीवल्ली गांधी, कामाक्षी मणेरकर, अथर्व नारायण, सोहम रायकर, अलाना आंद्राद, वीरजा देसाई यांना बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण अवधूत आंगले, शिवाजी आरास, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव दत्ताराम पिंगे, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, ज्ञानेश्वर नाईक, सत्यवान हरमलकर, विश्वास पिळर्णकर, नरेश पेडणेकर, नंधिनी सारिपल्ली-म्हामल यांच्या उपस्थितीत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com