गोव्याच्या कर्णधारपदासाठी एकनाथ आघाडीवर

मुंबईचे वयोगट स्पर्धेत नेतृत्व करताना हा यष्टीरक्षक-फलंदाज सफल ठरला होता
Cricketer Eknath Kerkar
Cricketer Eknath KerkarDainik Gomantak

Goa Cricket: सीनियर क्रिकेट संघासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन (GCA) नवा कर्णधार नियुक्त करणार हे स्पष्ट आहे. या पदासाठी पाहुणा क्रिकेटपटू एकनाथ केरकर (Cricketer Eknath Kerkar) याचे नाव आघाडीवर आहे. मुंबईचे वयोगट स्पर्धेत नेतृत्व करताना हा यष्टीरक्षक-फलंदाज सफल ठरला होता.

Cricketer Eknath Kerkar
'या' प्रकरणी 'युवराज सिंगला' अटक आणि जामीन

सगुण कामत याच्या निवृत्तीनंतर मागील दोन मोसमात पाहुणा अष्टपैलू कर्नाटकचा अमित वर्मा याने गोव्याचे कर्णधारपद भूषविले होते. यंदा जीसीएने अमितचा करार वाढविला नाही, त्यामुळे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि रणजी करंडक स्पर्धेसाठी गोव्याच्या संघासाठी नवा कर्णधार असेल. प्राप्त माहितीनुसार, टी-20 स्पर्धेसाठी आठवडाभरात संघ निवड अपेक्षित असून तेव्हा कर्णधारपदी एकनाथला पसंती मिळू शकते. दिल्लीतील सराव दौऱ्यात 28 वर्षीय एकनाथने बहुतांश लढतीत संघाचे नेतृत्व केले होते.

के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ सध्या पर्वरी येथे सराव करत आहे. टी-20 स्पर्धेतील मोहीम चार नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यापूर्वी संघ विलगीकरणासाठी लखनौला रवाना होईल. स्पर्धेसाठी या आठवड्यात संघाची निवड होऊ शकते.

Cricketer Eknath Kerkar
T20 World Cup: आता मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार सामने, ICC चा PVR सोबत करार

मुंबईचा सफल कर्णधार

एकनाथने मुंबईचे 16, 19, 13 व 25 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व, तसेच नेतृत्व केले. रणजी करंडक स्पर्धेतही तो मुंबईतर्फे खेळला आहे. एकनाथ कर्णधार असताना मुंबईने 2015-16 मोसमात 23 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

गोव्यातर्फे दुसरा मोसम

एकनाथ केरकरचा यंदा गोव्यातर्फे दुसरा मोसम आहे. गतमोसमात त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेतील पाच सामन्यांत 31च्या सरासरीने 124 धावा केल्या होत्या. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत त्याने आक्रमकता प्रदर्शित केली होती. पाच सामन्यांत 85च्या सरासरीने 340 धावा करताना एक शतक व एक अर्धशतक नोंदविले होते. सूरत येथे झालेल्या सामन्यात त्याने सलामीस येत हैदराबादविरुद्ध 143 चेंडूंत 19 चौकार व दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 169 धावांची तडाखेबंद खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com