IPL 2023: आयपीएल इतिहासातील असे 5 मोठे रेकॉर्ड्स, जे...

आयपीएल (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak

IPL 2023: आयपीएल (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 31 मार्च ते 28 मे दरम्यान क्रिकेटचा हा महाकुंभ चालणार आहे.

यादरम्यान अनेक मोठे विक्रम मोडले जातील, अनेक नवे विक्रम बनतील. बड्या दिग्गज फलंदाजांनी आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. आयपीएल इतिहासातील असे 5 मोठे विक्रम जे मोडणे अशक्य नाही, पण ते सोपेही होणार नाही.

दरम्यान, 2016 च्या आयपीएलमध्ये एकच नाव गाजलं होतं, ते नाव होतं विराट कोहली (Virat Kohli). 2016 मध्ये, RCB कर्णधार विराट कोहलीने त्या IPL मोसमात गोलंदाजांची धुळधान केली होती. कोहलीच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात एकाच मोसमात सर्वाधिक धावा आहेत.

2016 च्या आयपीएल हंगामात खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये त्याने 975 धावा केल्या होत्या. त्या मोसमात एकट्या कोहलीने 4 शतके झळकावली होती. मात्र, आरसीबी संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले.

Virat Kohli
IPL 2023 पूर्वीच लखनऊच्या संघाने घेतला मोठा निर्णय, टीम दिसणार नव्या अवतारात; Video

दुसरीकडे, ही खेळी कोण विसरु शकेल. तो दिवस होता 23 एप्रिल 2013. त्यादिवशी क्रिकेटच्या मैदानात धावांचे वादळ उठले होते.

पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध गेलने एकट्याने 175 धावांची तुफानी खेळी खेळली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे, जी आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.

तसेच, आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर असा विक्रम आहे की, इतर कोणताही संघ बरोबरी करु शकत नाही. चेन्नईचा संघ हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलेला संघ आहे. चेन्नईने 9 वेळा आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या संघाने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे.

Virat Kohli
Mumbai Indians: बुमराहनंतर आता 'हा' खेळाडूही IPL 2023 मधून बाहेर! धक्कादायक अपडेट आले समोर

2017 मध्ये, RCB ने IPL इतिहासातील सर्वात लहान धावसंख्या केली. कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबी संघाचा अवघ्या 49 धावांत गुंडाळला होता. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात लहान धावसंख्या आहे.

त्याचबरोबर, ख्रिस गेलने IPL 2011 मध्ये एका षटकात 37 धावा काढल्या होत्या. कोची टस्कर्स केरळविरुद्ध त्याने एका षटकात 37 धाव काढल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात महागडा षटक ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com