IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा पडणार पावसाचे पाणी? काय आहे हवामान अंदाज, वाचा

World Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान संघात अहमदाबादमध्ये शनिवारी सामना होणार असून या दरम्यान कसे हवामान असेल, जाणून घ्या.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Ahmedabad Weather Update:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी रंगणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी यंदाच्या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. शनिवारी होणारा सामना या दोन्ही संघांसाठी या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दरम्यान, दोन्ही संघ या सामन्यात विजयी लय कायम राखण्यात उत्सुक असतील.

India vs Pakistan
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराटची तळपली बॅट, रोहितचा रेकॉर्ड कसा? पाहा आकडेवारी

जवळपास लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर हा सामना खेळला जाणार आहे, अशात हवामानही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच यावर्षी सप्टेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान आशिया चषक 2023 स्पर्धेत दोनदा आमने-सामने आले होते, तेव्हा पावसाचा मोठा अडथळा आला होता. त्यामुळे शनिवारी अहमदाबादमधील वातावरण कसे असेल, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला असेल.

दरम्यान, Accuweather च्या अंदाजानुसार शनिवारी अहमदाबादमधील हवामान चांगले राहिल. तसेच पावसाची शक्यता अगदी नगण्य आहे.

तसेत रिपोर्ट्सनुसार अहमदाबादमधील हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये काहीसे ढगाळ वातावरण शनिवारी राहू शकते, तसेच पावसाचा शिडकावाही होऊ शकतो. तसेच तापमान ३०-३५ डिग्री सेल्शियसपर्यंत राहू शकते. तसेच हवेत ५० टक्के आद्रता असू शकते. तसेच हवामान बऱ्यापैकी उष्ण असेल.

India vs Pakistan
IND vs PAK सामन्यापूर्वी सूर्यकुमारची पोस्ट व्हायरल; म्हणतोय 'भाईलोग सगळ्यांच्या घरी टीव्ही आहेत...'

खेळपट्टीची मदत कोणाला?

हवामान अंदाजानुसार वातावरण उष्ण राहणार असल्याने फलंदाजांना मदत होऊ शकते. तसेच जर दव पडले, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघालाही मदत मिळू शकते. अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत वर्ल्डकप 2023 मधील पहिलाच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला आहे.

या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने 37 षटकांच्या आतच 9 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे या निकालावरून तरी या खेळपट्टी फलंदाजांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शनिवारी गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com