Ranji Trophy : गोव्याचा रणजी क्रिकेट संघ कायम; तीन लढतीसाठी बदल नाही

मंगळवारपासून कर्नाटकविरुद्ध सामना
Goa captain Darshan Misal
Goa captain Darshan MisalDainik Gomantak
Published on
Updated on

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पुढील तीन सामन्यांसाठी गोव्याचा सोळा सदस्यीय संघ कायम ठेवण्यात आला आहे. सीनियर निवड समितीची बैठक रविवारी झाली, त्यावेळी संघ बदल न करण्याचा निर्णय झाला.

पुढील तीन सामन्यांसाठी संघ कायम असल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे देण्यात आली. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना पर्वरी येथे मंगळवारपासून (ता. 27) कर्नाटकविरुद्ध खेळला जाईल. त्यानंतर तिरुअनंतपुरम येथे तीन जानेवारीपासून केरळविरुद्ध, तर पुदुचेरीविरुद्ध 10 जानेवारीपासून पर्वरी येथे सामना होईल. या सर्व सामन्यांसाठी राजस्थान व झारखंडविरुद्ध निवडलेला संघच कायम राहील.

Goa captain Darshan Misal
Goa Mining : गोवा सरकार लवकरच आणखी 40 खाण लीजचा लिलाव करणार ?

गोव्याने स्पर्धतील दोन्ही सामने अनिर्णित राखले आहेत. त्यांचे सध्या चार गुण आहेत. राजस्थानविरुद्ध त्यांनी तीन, तर झारखंडविरुद्ध एका गुणाची कमाई केली.

गोव्याचा रणजी संघ

दर्शन मिसाळ (कर्णधार), सिद्धेश लाड (उपकर्णधार), अमोघ देसाई, सुमीरन आमोणकर, ईशान गडेकर, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, समर दुभाषी, एकनाथ केरकर, लक्षय गर्ग, अर्जुन तेंडुलकर, ऋत्विक नाईक, फेलिक्स आलेमाव, मोहित रेडकर, दीपराज गावकर, शुभम देसाई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com