Ranji Trophy: गोव्याच्या सुयशचे तूफानी 'शतक'; कर्नाटकला दिली कडवी झुंज

पणजी: गोवा संघाचा सलामीवीर सुयश प्रभुदेसाईने सलग दुसऱ्या सामन्यात तूफानी शतक ठोकले.
Suyash Prabhudesai
Suyash PrabhudesaiDainik Gomantak

पणजी: गोवा संघाचा सलामीवीर सुयश प्रभुदेसाईने सलग दुसऱ्या सामन्यात तूफानी शतक ठोकले. त्याच्या नाबाद 143 धावांच्या खेळीमुळे गोव्याला 177 धावांची पिछाडी भरुन काढणे शक्य झाले आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात कर्नाटकला घरच्या मैदानावर विजय नोंदवणे अशक्य ठरले. अनिर्णित सामन्यात अखेरच्या दिवशी सुयशची जिगर निर्णायक ठरली.

दरम्यान, म्हैसूर येथे झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी गोव्याने झुंजार खेळ करताना दुसऱ्या डावात 6 बाद 282 धावा केल्या होत्या, खेळ थांबला तेव्हा त्यांच्यापाशी 105 धावांची आघाडी जमा झाली होती. सुयशने 143 धावांच्या खेळीत 289 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार लगावले. सोमवारी सकाळी कालचा आक्रमक अर्धशतकवीर के. व्ही. सिद्धार्थ (57) लगेच बाद झाल्यामुळे दुसऱ्या विकेटची 93 धावांची भागीदारी भंग झाली. नंतर स्नेहल कवठणकर जास्त वेळ टिकला नाही. मात्र दीपराज गावकरने (36) पिछाडी भरुन काढताना सुयशला चांगली साथ दिली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करुन संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. चहापानानंतर अकरा षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी अनिर्णित निकालास मान्यता दिली.

Suyash Prabhudesai
Ranji Trophy Cricket Tournament: चिवट सिद्धार्थचे दीडशतक, इतरांची फक्त हजेरी

कर्नाटकला तीन गुण

कर्नाटकच्या डावात शतकी खेळी केलेला कर्णधार मयांक अगरवाल सामन्याचा मानकरी ठरला. पहिल्या डावातील आघाडीचे त्यांना तीन गुण मिळाले. कर्नाटकचे आता तीन लढतीतून नऊ गुण झाले आहेत. गोव्याला एक गुण मिळाला. त्यामुळे त्यांचे चार गुण झाले आहेत. कर्नाटकचा संघ पुढील लढतीसाठी त्रिपुराविरुद्ध (8 गुण) खेळण्यासाठी आगरतळा येथे जाईल. गोव्याचा सामना पर्वरी येथे पंजाबविरुद्ध (2 गुण) होईल. चौथ्या फेरीतील सामने 26 जानेवारीपासून खेळले जातील.

Suyash Prabhudesai
Ranji Trophy Cricket Tournament: गोव्याचा संघ साफ निष्प्रभ; संघावर फॉलोऑनचे सावट

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 321

कर्नाटक, पहिला डाव: 9 बाद 498 घोषित

गोवा, दुसरा डाव (1 बाद 93 वरुन): 100 षटकांत 6 बाद 282 (सुयश प्रभुदेसाई नाबाद 143, के. व्ही. सिद्धार्थ 57, स्नेहल कवठणकर 8, दीपराज गावकर 36, दर्शन मिसाळ 13, अर्जुन तेंडुलकर 6, समर दुभाषी नाबाद 0, व्ही. वैशाख 2-35, रोहित कुमार 2-67, शुभांग हेगडे 1-77, एम. व्यंकटेश 1-29).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com