Under-19 World Cup: अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय; 201 धावांनी आयर्लंडचा उडवला धुव्वा

Under-19 World Cup: टीम इंडियासाठी नमन तिवारी आणि सौम्या पांडे यांनी शानदार गोलंदाजी केली.
Under-19 World Cup
Under-19 World CupDainik Gomantak
Published on
Updated on

Under-19 World Cup: अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केले होते. तर आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा फडशा पाडला आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा तब्बल 201 धावांनी पराभूत केले आहे.

आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने उत्तम गोलंदाजी आणि उत्तम फलंदाजीच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. टीम इंडियाने अशीच कामगिरी सुरु ठेवल्यास अंडर-19 चा किताब आपल्या नावावर करु शकते.

दरम्यान, उदय सहारनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 301 धावा बनवल्या होत्या.

आयर्लंडला 302 धावाचं विशाल लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ फक्त 100 धावाचं करु शकला. टीम इंडियासाठी नमन तिवारी आणि सौम्या पांडे यांनी शानदार गोलंदाजी केली. नमन तिवारीने चार तर सौम्या पांडेने तीन विकेट्स घेतल्या.

दरम्यान, टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. आयर्लंडच्या संघाची पहिली विकेट्स अवघ्या 22 धावांवर पडली. जार्डनने 11 धावा तर रेयान 13 धावा काढल्या.

तर हिलटन आणि कर्णधार रोक्स खाते न उघडता पव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे आयर्लंडचे फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. डेनियल अवघ्या 22 धावा काढून बाद झाला.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने मुशीर खानच्या शानदार शतकाच्या जोरावर 301 धावांचं विशाल लक्ष्य आयर्लंडच्या संघाला दिलं होतं. त्याने 118 धावांच्या तूफानी खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार लगावले.

मुशीर 66 चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्या 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मुशीरने टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनच्या साथीने 156 धावांची शानदार भागीदारी केली होती.

टीम इंडियातील प्रतिभावन खेळाडू सचिन धासने शेवटच्या षटकांमध्ये आपल्या शानदार फलंदाजीने छाप सोडली. टीम इंडियाचा विशाल स्कोर उभारण्यात त्यानेही हातभार लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com