Indian Super League: एफसी गोवाच्या लागोपाठ पराभवानंतर प्रशिक्षक संतापले; म्हणाले...

Indian Super League: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर बुधवारी रात्री एफसी गोवाला नॉर्थईस्ट युनायटेडने दोन गोलने हरवले.
FC Goa Coach Manolo Marquez
FC Goa Coach Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग 12 अपराजित लढतीनंतर लागोपाठ दोन लढतीत पराभूत झालेल्या एफसी गोवा संघावर प्रशिक्षक मानोलो मार्केझ प्रचंड संतापले आहेत. स्पष्ट शद्बांत नाराजी व्यक्त करताना त्यांनी आपला संघ ठरलेल्या शैलीनुसार खेळत नसल्याबद्दल टीकाही केली.

दरम्यान, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर बुधवारी रात्री एफसी गोवाला नॉर्थईस्ट युनायटेडने दोन गोलने हरवले, त्यापूर्वी याच मैदानावर मोहन बागाननेही त्यांना एका गोलने पराजित केले होते. एफसी गोवा संघ आता 14 सामन्यांतून 28 गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे. त्यांचा पुढील सामना रविवारी (ता. 25) केरळा ब्लास्टर्सविरुद्ध कोची येथे खेळला जाईल.

FC Goa Coach Manolo Marquez
Indian Super League: एफसी गोवाला चुका पडल्या महागात; नॉर्थईस्ट युनायटेडने नोंदवला शानदार विजय

संघाकडून खराब खेळ

नॉर्थईस्टविरुद्धच्या सामन्यानंतर मार्केझ यांनी सांगितले, की `मी खूप रागावलोय. स्वतःवर, खेळाडूंवर आणि प्रत्येकावर प्रचंड नाराज आहे. आम्ही अतिशय खराब खेळलो असे मला वाटते. मैदानावर नेमके काय करणे आवश्यक आहे याची नॉर्थईस्ट युनायटेडला जाणीव होती. त्यांनी जरी पेनल्टी व कॉर्नरवर गोल केलेला असला, तरी एक संघ या नात्याने तेच सरस होते.` एफसी गोवाला सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी होत्या, पण ते अपयशी ठरले. याविषयी स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले, की `आम्ही काही संधी निर्माण केल्या, परंतु खेळाडू नव्हते (सर्वोत्तम कामगिरीजवळपास). त्यांना माहितच नव्हते की काय घडत आहे. अशाप्रकारे नियमित मोसम खेळणे कठीण आहे.`

FC Goa Coach Manolo Marquez
Indian Super League: एफसी गोवा आक्रमणासाठी सज्ज; मोहन बागानविरुद्ध उद्या करणार दोन हात!

पहिल्यांदाच लागोपाठ दोन पराभव

मार्केझ यांच्या मार्गदर्शनखाली एफसी गोवावर पहिल्यांदाच लागोपाठ दोन सामने गमावण्याची पाळी आली आहे. या संघाला पुढील वाटचालीत कठीण सामने खेळायचे आहेत. केरळा ब्लास्टर्स व मुंबई सिटी या मातब्बर संघांविरुद्धच्या लढती अवे मैदानावर आहेत. आगामी सामन्यांत मार्केझ यांना खेळाडूंकडून तातडीने सावरत सक्रिय प्रतिसाद अपेक्षित आहे. त्यांनी खेळाडूंनी जबाबदारी जाणण्याची गरज प्रतिपादली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com