अजब-गजब! जपानमध्ये आवाज करत जेवणे मानले जाते शुभ, जाणून घ्या वेगवेगळ्या देशातील रोचक परंपरा

जगभरात खाण्या-पिण्याच्या सवयी आणि पद्धती खुप वेगवेगळ्या आहेत.
Food
FoodDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरातील देशांमध्ये खाण्या-पिण्याशी संबंधित विविध परंपरा आज सुद्धा पाळल्या जातात. तसेच प्रत्येकाला महत्त्व देखील आहे. खाण्याच्या पद्धतीशी संबंधित काही परंपरा आहेत. यामध्ये हाताने आणि इतर वेळी चमच्याने पदार्थ खाण्याच्या पद्धतींचा समावेश आहे. देशांच्या काही खाण्यासंबंधित रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

जपान

अनेक लोक जेव्हा पदार्थ खातात तेव्हा मचमच आवाज करतात. असा आवाज करत पदार्थ खाणे वाईट मानले जाते. परंतु जपान मध्ये असे नाही. पण येथे सूप पिताना किंवा नूडल्स खाताना कोणी आवाज काढला तर त्याला वाईट मानले जात नाही. अशा प्रकारे पदार्थ खाल्ल्याने जेवणाची चव वाढते, अशी येथील लोकांची धारणा आहे. तसेच, अशा प्रकारे गरम अन्न चांगले खाऊ शकते.

थायलंड

थायलंडमधील पदार्थ खाण्याची पद्धत खूप विचित्र आहे. या ठिकाणी लोक पदार्थ चमच्याने उचलून किंवा थेट तोंडात टाकून खाणे चांगले मानले जात नाही. कारण इथले लोक काट्यांच चमचा वापरून फक्त पदार्थ उचलून चमच्यात ठेवण्यासाठी करतात. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही पदार्थ खात असाल तेव्हा काट्याचा चमचा वापरून चमच्यात पदार्थ ठेवा आणि नंतर चमच्याने पदार्थ खातात.

भारत

भारत आणि अनेक मध्य-पूर्व आशियाई देशांमध्ये डाव्या हाताने खाणे अशुभ मानले जाते. कारण लोकांचा असा विश्वास आहे की डाव्या हाताचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. म्हणून त्या हाताने अन्न खाऊ नये. यासाठी ते लोक उजवा हात वापरतात. लोकांच्या मते, उजव्या हाताचा वापर जेवण करणे आणि इतर शुभ कामांसाठी करणे चांगले आहे.

दक्षिण कोरिया

अनेक ठिकाणी असे घडते की जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा तो अन्न खातो, परंतु दक्षिण कोरियामध्ये तसे नाही. जोपर्यंत कुटुंबातील मोठी व्यक्ती जेवायला सुरुवात करत नाही तोपर्यंत टेबलवर बसलेला इतर सदस्यही जेवायला सुरुवात करत नाही. एवढेच नाही तर वयोवृद्ध सदस्याचे जेवण संपेपर्यंत कोणीही टेबल सोडू शकत नाही.

इटली

इटली मध्ये तुम्ही सीफूडच्या वर चीज मागितल्यास ते चांगले मानले जात नाही. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने माशांसह चीज खाल्ले तर त्याला माशांसोबत पोहावे लागते. एवढेच नाही तर जेवल्यानंतर दूध असलेले पेय पिणे देखील येथे चांगले मानले जात नाही. कारण त्याचा पचनावर परिणाम होतो. त्याऐवजी इथले लोक जेवणानंतर ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com