Sign Of Heart Attack: उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अशी ओळखावीत हृदयविकाराची लक्षणे

Sign Of Heart Attack: उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी त्यांच्या शरीरात काही लक्षणे दिसून येतात.
Heart Attack
Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Sign Of Heart Attack: आजच्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी कमी वयातच अनेक आजार शरीरावर ताबा मिळत असल्याचे अनेक रिसर्चदरम्यान दिसून आले आहे.

अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यातीलच एक सामान्य झालेला आजार म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना इतर आजारांनाही सामोरे जावे लागते.

महत्वाचे म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा त्रासदेखील सहन करावा लागतो. अशा रुग्णांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी त्यांच्या शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे कोणती हे आज आपण जाणून घेऊयात.

१. अचानक घाम यायला सुरुवात होते

अचानक तुम्हाला घाम यायला सुरूवात होते, हे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक लक्षण मानले जाते. त्याचे दोन अर्थ आहेत. एक, हे शरीरात रक्तदाब वाढल्याचे लक्षण असू शकते. दुसरे म्हणजे, हे हृदयविकाराचे प्राथमिक लक्षण देखील असू शकते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सतत आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जागरुक राहणे आवश्यक आहे.

२. चक्कर येते

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा चक्कर येणे सामान्य आहे. पण कधी कधी ही चक्कर येणे हृदयविकाराचे लक्षण देखील असू शकते. मात्र चक्कर येण्याचा संबंध नेहमी रक्तदाबाशी जोडणे अयोग्य आहे. तुम्हाला जर काही वेगळे वाटले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांबरोबर संपर्क साधला पाहिजे.

३. हृदयाचे ठोके वाढतात

तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. अनेक वेळा धावपळ करणे, जास्त काम करणे, तणाव असणे यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके सामान्य करण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Heart Attack
Malaika Arora Skin Care: मलायका म्हणते... सुंदर त्वचेसाठी 'या' गोष्टी नक्की फॉलो करा

४.धाप लागते

उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये धाप लागण्यासारखी यासारखी लक्षणे सामान्यतः दिसून येतात. परंतु हे लक्षण केवळ उच्च रक्तदाबाचे लक्षण मानून त्याकडे दुर्लक्ष करू नका. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशी लक्षणे दिसू लागताच ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या शरीराची तपासणी करून घेणे जास्त चांगले ठरते.

५. थकवा जाणवतो

अति थकवा जाणवणे हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. म्हणूनच अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com