Rashi Bhavishya 24 December: 'या' राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो; वाचा पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 24 December 2023: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Rashi Bhavishya 24 December 2023 | Daily Horoscope
Rashi Bhavishya 24 December 2023 | Daily Horoscope Dainik Gomantak
Published on
Updated on
  • मेष

दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. तुमच्या आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अश्या ठिकाणी गुंतवणूक करू नका ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. (Daily Horoscope 24 December 2023)

  • वृषभ

भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकतात. तुमचे असणे हे त्याच्या/तिच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात.

  • कर्क

खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. आजची संद्याकाळी मैत्रीच्या नावे- खूप वेळा तुम्ही आपल्या मित्रांसोबत वेळेचा भरपूर आनंद घेऊ शकतात परंतु, आरोग्याच्या दृष्टीने जरा सांभाळून राहा. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. 

  • सिंह

तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल.

  • कन्या

आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मानवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.

  • तुळ

चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात 

  • वृश्चिक

दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात.

  • धनु

तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. 

  • मकर

आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. 

  • कुंभ

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल.

  • मीन

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com