Rashi Bhavishya 13 February 2024: आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा! वाचा पूर्ण राशीभविष्य

Daily Horoscope 13 February 2024: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Rashi Bhavishya 13 February 2024 in Marathi
Rashi Bhavishya 13 February 2024 in MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

Rashi Bhavishya 13 February 2024 in Marathi

  • मेष

तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. (Daily Horoscope 13 February 2024)

  • वृषभ

आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल - जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल.

  • कर्क

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. 'सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. 

  • सिंह

कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे.

  • कन्या

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या त-हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत

  • तुळ

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. 

  • वृश्चिक

आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. 

  • धनु

आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

  • मकर

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे.

  • कुंभ

मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

  • मीन

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com