Mocktail Recipe: न्यु ईयरला घ्या नॉन अल्कोहोलिक पार्टीचा आनंद, ट्राय करा 'हे' हेल्दी मॉकटेल

New Year Celebration: तुम्हीही अल्कोहोल घेत नाही तर ट्राय करु शकता हेल्दी मॉकटेल
Mocktail Recipe:
Mocktail Recipe:Dainik Gomantak

न्यु ईयर अवघे काही दोन दिवसांवर येउन ठेपले आहे. सर्वजण न्यु ईयर पार्टीची तयार करत आहेत. पार्टीदरम्यान काही लोक त्यांच्या आवडीच्या ड्रिंक्सचा आस्वाद घेतात. पण तुम्ही देखील नॉन अल्कोहोलिक पर्सन असाल तर काळजी करू नका. येथे आम्ही अशाच काही फिटनेस फ्रीक्ससाठी हेल्दी मॉकटेल रेसिपी घेऊन आलो आहोत. जे पार्टीला अधिक आनंददायी तर बनवेलच पण तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.

  • स्ट्रॉबेरी कोम्बुचा मोइतो (Strawberry Kombucha Mojito)

लागणारे साहित्य

१६ आउंस स्ट्रॉबेरी कोम्बुचा

१/२ कप ताज्या स्ट्रॉबेरीचे चौकोनी तुकडे

६-८ ताजी रास्पबेरी

८ पुदिन्याची पाने

१ कप स्पार्कलिंग वॉटर

१/२ लिंबाचा रस

बर्फ

कसे बनवावे

स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, पुदिना आणि लिंबाचा रस प्युरी होईपर्यंत मॅश करा किंवा त्याची प्युरी करा. आता प्युरी २ मेसन जारमध्ये विभाजित करा. प्रत्येक ग्लासमध्ये कोम्बुचा घाला आणि त्यानंतर स्पार्कलिंग वॉटर घाला आणि बर्फाचे तुकडे घाला. तुमचे मॉकटेल तयार आहे.

Strawberry Kombucha Mojito
Strawberry Kombucha MojitoDainik Gomantak
Mocktail Recipe:
Eating Tips: ...म्हणून चमच्याने नव्हे तर हाताने जेवणं करणे चांगलं!

संगरिया मॉकटेल (Sangria Mocktail)

लागणारे साहित्य

६ हिबिस्कस टी बॅग्स

सुमारे ३ कप उकळते पाणी

३ कप थंड पाणी

१ सफरचंद (चिरलेले)

१ संत्र (सालासह कापलेले)

कसे बनवावे

एक मोठ्या कप किंवा कंटेनरमध्ये टी बॅग्सला गरम पाण्यात ८ मिनिटे भिजवा. आता टी बॅग्स बाहेर काढा. एका जग मध्ये चहा, थंड पाणी आणि फळे एकत्र करा. चहा पूर्णपणे थंड होईपर्यंत २ तासांपर्यंत रेफ्रिजरेट करा. आता बर्फ घाला आणि ग्लासमध्ये चांगले सर्व्ह करा, आवश्यक असल्यास चिरलेली फळे घाला.

Sangria Mocktail
Sangria MocktailDainik Gomantak
  • सिंपल पाइनअॅपल जिंजर कोम्बुचा मॉकटेल (Simple Pineapple Ginger Kombucha Mocktail)

लागणारे साहित्य

२ कप अननसाचा रस (थंड केलेले)

१/४ कप लिंबाचा रस (थंडगार)

२ चमचे शुद्ध मॅपल सिरप

१ लिंबू (कापलेले)

२ कप आले कोम्बुचा (थंड)

४ औंस ऑरेंज लिकर (ऑप्शनल)

५ स्ट्रींग्स ताजे रोझमेरी

१ टीस्पून साखर

कसे बनवावे

रोझमेरीच्या एका स्ट्रींगमधून पाने काढा आणि खूप बारीक चिरून घ्या. साखर मिक्स करा आणि एका लहान प्लेट किंवा डिशमध्ये ठेवा. प्रत्येक ग्लासच्या कडांना लिंबू चोळा, नंतर ग्लासला रिम करण्यासाठी रोझमेरी-साखर मिश्रणात ग्लास उलटा करा. एका भांड्यात अननसाचा रस, लिंबाचा रस आणि मॅपल सिरप एकत्र करा. चांगले मिक्स करा. कारण मॅपल सिरप तळाशी बुडेल. हळूहळू कोम्बुचा घाला. आता हे बर्फाने भरलेल्या रोझमेरी-रिम केलेल्या ग्लासमध्ये घाला आणि लिंबाचा तुकडा आणि ताज्या रोझमेरी कोंबने सजवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com