Walking Benefits: चलते रहो! चलते रहो! शरीर तंदुरूस्त ठेवायचंय ना? मग चाला

Walking Benefits: सोप्या आणि बिनखर्चाच्या व्यायामाची किल्ली - 'चालणे'
Walking Benefits
Walking BenefitsDainik Gomantak

Walking Benefits: सध्याच्या धावपळीच्या जीवनात शरीराला अत्यावश्यक असा व्यायाम करणे अनेकदा इच्छा असूनही शक्य होत नाही. कधी पुरेसा वेळ मिळत नाही. कधी इतर कामांचा ताण थकवा इतका असतो की, व्यायाम करावासा वाटत नाही.

फ्लॅट संस्कृतीमुळे घरातच व्यायाम शक्य होत नाही अन् उघडी मैदाने लुप्त होत चालली आहेत. फॅन्सी व्यायामशाळांची मेंबर फी आवाक्याबाहेर असते. एक ना अनेक कारणे आहेत, पण ज्यांना खरोखरच आपले शरीर तंदुरूस्त ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी साधा-सोपा-बिनखर्चाचा व हुकमी व्यायामप्रकार उपलब्ध आहे, तो म्हणजे 'चालणे'!

सहजच मनात प्रश्न येईल की, चालणे हा उत्तमव्यायाम असेल तर तमाम पोस्टमन मंडळी तगडी, निकोप का नाहीत ? पण पोस्टमनचे कामानिमित्त चालणे वेगळे आणि व्यायाम म्हणून चालणं वेगळं.

याचा अर्थ चालण्याचा व्यायाम घेण्यासाठी काही मंत्र तंत्र लागतात असं नाही; परंतु 'चाल' कशी आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. चालण्याचे फायदे, दररोज किती चालणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे चालण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

पद्धत:-

  • झपझप चालणे-

शक्य होईल तितक्या झपझप चालणे जास्त फायदेशीर ठरते. तसेच पाऊल टाकताना शरीराचा भार प्रथम टाचेवर देऊन मग चवड्यावर टाकण्याने स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. शिवाय टाच ते चवडा असे पाऊल टाकताना किंचित आत वळविणे श्रेयस्कर ठरेल.

  • ताठ मानेने चाला-

चालताना ताठ मानेने चाला. छाती बाहेर काढा व पोट जमेल तेवढे आत घ्या. चालताना नितंबाला झोक देऊन चालतात तर ते आणखी चांगले. अर्थात अशी 'चाल' दिसायला वाईट दिसते; पण शरीराला ती जास्त चांगली असते. तसेच चालताना पृष्ठभाग जेवढा जास्त आवळून धराल तेवढा चांगला व्यायाम होतो.

  • किमान 5 वेळा अर्धा अर्धा तास

आठवड्यात किमान 5 वेळा अर्धा अर्धा तास चालण्याचा व्यायाम आवश्यक आहे. एखाद्या दिवशी चालणे जमले नाही, तर त्याची कसर दुसऱ्या दिवशी काढा. रोज बसने कामावर जात असाल तर ऑफिसजवळील स्टॉपपेक्षा एक स्टॉप अलिकडे उतरा आणि चालत ऑफिसला जा. कदाचित बस तिकिटाला कमी पैसे लागतील आणि सहजपणे व्यायामही होऊन जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com