Daily Horoscope 25 September: महत्वाचे निर्णय घेताना विचार करा; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 25 September: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 25 September
Daily Horoscope 25 SeptemberDainik Gomantak
Published on
Updated on
  • मेष

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही.  (Daily Horoscope 25 September)

  • वृषभ

तुमच्या अवतीभवती असलेल्या महत्त्वाचे निर्णय घेणाºया लोकांना तुमची मते सांगा त्याचा तुम्हाला फायदा होईल - तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. दिवस चांगला आहे दुसऱ्यांसोबतच तुम्ही स्वतःसाठी ही वेळ काढू शकाल. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल. (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल - म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका - थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. ज्या लोकांनी अतीत मध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. 

  • कर्क

आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.

  • सिंह

मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा.

  • कन्या

अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आज जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरचांना चिंतीत करू शकतात परंतु, या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

  • तुळ

इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. 

  • वृश्चिक

कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे परंतु, तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर, लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतीत होऊ शकतात म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की, लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. 

  • धनु

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हसित करणा-या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. 

  • मकर

अनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे

  • कुंभ

तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

  • मीन

तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुस-या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com