Rashi Bhavishya 4 October 2024: 'या' राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ!! जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Daily Horoscope 4 October 2024: आज काही लोकांना होणार धनलाभ, काहींसाठी असेल उत्तम दिवस
Daily Horoscope 4 October 2024: आज काही लोकांना होणार धनलाभ, काहींसाठी असेल उत्तम दिवस
Rashi Bhavishya 4 October 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

आजचे पंचांग

  • शुक्रवार, ४ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष.

  • तिथि- द्वितीया २९l३१ पर्यंत.

  • रास- तुळ

  • नक्षत्र- चित्रा १८l३८

  • योग - वैधृति २९l२१

  • करण - बालव २६l५९

  • दिनविशेष - वैधृति वर्ज्य

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे )

  • मेष

घरातील लोकांवर चिडचिड होण्याची शक्यता आहे त्यामुळे कमीत कमी संवाद साधा. घरासंदर्भातील कामे होतील,जुन्या लोकांकडून काहीतरी लाभ होईल, व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी चांगल्या घटना घडतील. चांगले लाभ होतील.

  • वृषभ

आपल्या परीक्षेचं चागले फल मिळण्याचा दिवस आहे,यात्रा घडेल, सुखकर प्रवास घडतील,प्रेम मिळेल, विद्वान लोकांची भेट होईल, शेअर मार्केटमध्ये लाभ होईल, इष्ट देवतेची आराधना करावी. प्रसन्नता वाटेल.

  • मिथून

कामाचे अधिक टेन्शन घेऊ नये,त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो,जेवढे मोकळे राहाल तेवढे आरोग्य उत्तम राहील, प्रतिकार शक्ती उत्तम लाभेल, शत्रूंपासून सावधान राहावे, काही ताणतणाव नाहीच अशीच कल्पना करावी.

  • कर्क

आपल्या गुरुजनांची भेट होण्याची शक्यता आहे ,उत्तम मार्गदर्शन मिळेल,पत्नीकडून लाभ होईल, पार्टनरशिप मधून फायदा होईल,दूरचे प्रवास घडतील,कुलदेवतेचे दर्शन घ्यावे इष्ट कार्य पूर्ण होतील.

  • सिंह

एकांत जाणवू शकतो,अध्यात्मिक विचार येतील,प्रवासाची इच्छा होईल,वाहने सावकाश चालवा,साधारण दिवस उत्तम जाईल. जुन्या लोकांची भेट होईल,आरोग्य सांभाळावे.

  • कन्या

शिक्षणासंदर्भात कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडेल, दुहेरी विचार निर्माण होतील परंतु अंती उत्तम निर्णय घ्याल, नैसर्गिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने आरोग्य सांभाळावे.

  • तूळ

नोकरीच्या ठिकाणी चांगल्या घटना घडतील,व्यवसायात चांगले लाभ होतील,आपले सिनियर अधिकारी आपल्यावर प्रसन्न होतील,प्रमोशन इत्यादी सारख्या घटना घडण्याची संभावना आहे किंवा अशाच प्रकारे चांगले कार्य घडतील.

  • वृश्चिक

बंधू भगिनी किंवा मित्रमंडळी यांच्याकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता दिसते,जवळचे प्रवास घडतील,सावधान राहावे फसवणुक होण्याची शक्यता आहे,आजच्या कार्यात उत्तम यश मिळेल.

  • धनु

घरासाठी खर्च होईल, हॉस्पिटल खर्च होण्याची शक्यता आहे,व्यर्थ खर्च करू नये,शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. गृहसौख्यासाठी झालेला खर्च चांगल्यासाठीच होईल,तरीही सावधानतेने खर्च करावा.

  • मकर

आज अधिक कामे होतील परंतु तरीही प्रसन्नता जाणवेल, कारण आपल्या कामाचा योग्य नफा आज आपल्याला मिळेल,चांगले लोक भेटतील,संशयी स्वभाव ठेवू नये जे पण लोक भेटतील योग्य भेटतील काळजी नसावी.

  • कुंभ

कुटुंब सुख मिळेल, वाणी उत्तम ठेवाल तर लाभ देखील उत्तम होईल,धनासंदर्भात आज छान फायदा होईल. मात्र आरोग्याची तक्रार येईल असे दिसते त्यामुळे बाहेरील खाणे टाळावे,आरोग्याची काळजी घ्यावी.

  • मीन

शेजारी लोकांशी सावधानता बाळगा किंवा प्रवासात सावधान रहा फसवणुक होण्याची शक्यता आहे, शक्यतो प्रवास टाळावा,कामे मात्र नियमित होतील,अनपेक्षित खर्च होईल,साधारण आरोग्य सांभाळावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com