Eye Checkup Camp: युरी आलेमाव यांच्या हस्ते पारोडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्‍घाटन

Yuri Alemao: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची गरज, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत तर होईल असे आलेमाव यांनी सांगितले.
Yuri Alemao:  ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची गरज, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत तर होईल असे आलेमाव यांनी सांगितले.
Yuri Alemao on Medical CampDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव, ता. १५ (खास प्रतिनिधी): पारोडा पंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. शेट्टी नेत्र रुग्णालय आणि पारोडा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पारोडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी युरी आलेमाव बोलत होते.

‘हा स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत तर होईलच, शिवाय समाजाला मदत करता येईल आणि एकमेकांची काळजी घेता येईल, असा सकारात्मक संदेशही या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहचेल,’ असे आलेमाव यांनी सांगितले.

आजकालच्या डोळ्यांशी संबंधित समस्यांच्या प्रकारांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "डोळ्यांची नियमित तपासणी महत्वाची आहे, विशेषत: मधुमेह किंवा संबंधित आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी, कारण ते दृष्टी सुरक्षित ठेवण्यास आणि संभाव्य समस्या लवकर ओळखण्यास मदत करतात. नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे, त्यामुळे डॉक्टरांनाही काही समस्या ओळखून रुग्णांवर उपचार करणे सोपे जाते. याद्वारे आपण भविष्यातील गुंतागुंत टाळू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो. "नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Yuri Alemao:  ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची गरज, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत तर होईल असे आलेमाव यांनी सांगितले.
Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या भागातील व्यावसायिक आस्थापनाच्या सीएसआर उपक्रमांच्या सहकार्याने अशा प्रकारची तपासणी शिबिरे आयोजित करू शकतात. प्रत्येकाने समाजाच्या भल्यासाठी योगदान दिले पाहिजे, तरच आपल्याला आपल्या जीवनात खरा आनंद मिळू शकेल असे आलेमाव यांचे म्हणणे आहे.

सरपंच पॉलीना फर्नांडिस म्हणाल्या की, भविष्यातही पंचायत ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारची शिबिरे आयोजित करेल, जेणेकरून त्यांना गावातच आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com