Goa Stray Cattle|भटक्या गुरांसाठी वास्को येथील युवकांनी दिला मदतीचा हात

काही युवकांनी एकत्र येऊन काही भटक्या गुरांच्या गळ्यांमध्ये परावर्तित पट्टे बांधले.
गुरांच्या गळ्यात परावर्तित पट्टे बांधण्याच्या कामामध्ये सहभागी झालेले सरपंच संकल्प महाले, ऐश्वर्या थोरात, अरुण नाईक व इतर.
गुरांच्या गळ्यात परावर्तित पट्टे बांधण्याच्या कामामध्ये सहभागी झालेले सरपंच संकल्प महाले, ऐश्वर्या थोरात, अरुण नाईक व इतर.Dainik Gomantak

वास्को: चिकोळणा बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, पंच ऐश्वर्या थोरात, पंच अरुण नाईक, पंच कायतान फिगेदों, अमेय सैल, सचिन चौगुले यांच्यासह काही युवकांनी एकत्र येऊन काही भटक्या गुरांच्या गळ्यांमध्ये परावर्तित पट्टे बांधले. या कामाबद्दल वाहनचालक तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तेथे भटकणाऱ्या सर्व गुरांच्या गळ्यांमध्ये परावर्तित पट्टे बांधण्याची गरज वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

(Youths of Vasco lend a helping hand for stray cattle)

गुरांच्या गळ्यात परावर्तित पट्टे बांधण्याच्या कामामध्ये सहभागी झालेले सरपंच संकल्प महाले, ऐश्वर्या थोरात, अरुण नाईक व इतर.
Goa Business|केळशीतील युवकाचा व्यवसायाचा फंडा

चिकोळणा येथील व्हिएरानगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शेकडो भटकी गुरे नजरेस पडतात. ही गुरे दिवसभर तेथील मोकळ्या जागेत चरतात. सायंकाळच्या वेळेस ती सर्व गुरे रस्त्यावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. रात्रभर रस्त्यावर बसलेल्या या भटक्या गुरांमुळे सकाळी संपूर्ण रस्त्यावर शेण पसरलेले दिसते. काहीवेळा या शेणावरूनदुचाकी घसरून वाहनचालक जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत.

काही वेळा भटकी गुरे अचानकपणे रस्त्यावर पळत येत असल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. याची दखल घेताना अमेय सैल, सचिन चौगुले यांनी तेथील भटक्या गुरांच्या गळ्यांमध्ये परावर्तित पट्टे घालण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांना संरपंच महाले, पंच ऐश्वर्या थोरात, पंच अरूण नाईक, सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा पवार, पीपल्स फॉर अॅनिमलच्या एलिझाबेथ वाल्सन व इतरांची साथ मिळाली. या सर्वांनी काही गुरांच्या गळ्यात परावर्तित पट्टे बांधले. इतरांच्या गळ्यातही लवकरच परावर्तित पट्टे बांधले जातील, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com