Crime News : शिवोलीत चाकूहल्ल्यात तरुण जखमी; तीन संशयित फरार

Crime News : यात साहील जबर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित कटानुसार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News :

शिवोली येथे डॉमिनोज पिझ्झा आस्थापन परिसरात शनिवारी मध्यरात्री साहील गडेकर (रा. नागझर-पेडणे) याच्यावर विश्वदीप नाईक, विघ्नेश चोडणकर, प्रज्योत साळगावकर, तुकाराम दाभोलकर या चौघांनी चाकू हल्ला केला.

यात साहील जबर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित कटानुसार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तत्काळ कारवाई करताना विश्वदीप नाईक (रा. क्रुझवाडा-मार्ना, शिवोली) याला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत केली आहे.

इतर तिघे आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास विश्वदीप, विघ्नेश, प्रज्योत, तुकाराम यांनी साहील यांची काळ्या रंगाची थार जीप (क्र: जीए-०३-आर-७१५४) डॉमिनोज पिझ्झा आस्थापनाकडे अडवून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

Crime News
Goa Weather Update: गोव्यात सोमवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33.5 अंशांवर

यावेळी गडेकर यांच्या मित्राच्या मोटारसायकलची (क्र. जीए-११-जे-४०७१) संशयितांनी दगड घालून मोडतोड केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या हल्ल्यात एका अल्पवयीन युवकाचाही सहभाग असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com