Wild Fruits: रानमेव्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे

चुन्ना, चाफरा बाजारात दाखल; शहरी भागात मागणी
Wild Fruits
Wild FruitsDainik Gomantak
Published on
Updated on

Wild fruits bloom in the forest वसंत ऋतूचे आगमन झाले असून साऱ्या निसर्गाला नवचैतन्याची पालवी फुटू लागली आहे. पाने, फुले, फळांनी निसर्ग खुलू लागला आहे. रानफुलांचा दरवळ आसमंतात भिडतो आहे आणि त्यासोबतच रानमेव्याचा खजिनादेखील निसर्गाने सर्वांसाठी खुला केला आहे.

गोव्यात चुरणां(तोरणे), करवंद, जांभळे, चाफरे, जांभ, कैरी, चिंच आदी रानेमेव्यांच्या बहरण्याला सुरवात झाली असून गोव्याच्या रानावनांत तोरणे पिकली आहेत. ग्रामीण भागातील मुले तसेच नागरिक या तोरणांचा (चुरणांचा) मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

शहरी भागात या रानमेव्याला प्रचंड मागणी आहे. रानमेवा जेवढा चविष्ट तेवढाच ती आरोग्यवर्धक आहे. पांढऱ्या तसेच किंचित लालसर अंगाचा हा रानमेवा सर्वत्र आढळतो. थोडेसे पिठूळ असणाऱ्या या रानमेव्याची चवच न्यारी.

काळी मैन्ना फुलतेय-

डोंगराची काळी मैन्ना असे संबोधल्या जाणाऱ्या करंवदांच्या झाडांना आता फुलोरा येऊ लागला तसेच काही लहान-लहान करवंदे धरू लागली आहेत. करवंदांच्या जाळीत शिरून काट्या-कुट्यांत ओरबडून करवंद काढताचक्षणी तोंडात टाकून करवंदांची आंबड गोड चव चाखण्याचा सुखानंदच और असतो. चाफरे व इतर रानमेवा फुलतोय. शहरी भागात त्याला चांगली मागणी आहे.

Wild Fruits
Japanese Tourist Fraud Case: जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना 50 हजाराचे बक्षिस

प्रक्रिया करणे गरजेचे-

कोकणपट्ट्यात विपूल प्रमाणात रानमेवा तसेच इतर फळे जसे की, आंबा, फणस, काजू, कोकम यांचे उत्पन्न होते; परंतु जेवढ्या प्रमाणात त्यांवर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करून ते बाजारात उपलब्ध करून द्यायला हवेत तशा पद्धतीचे कार्य अजून शेतकऱ्यांद्वारे होत नाही. त्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची जागृती होणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com