Goa Water Resources Department: जलस्त्रोत खात्याची ‘त्या’ दोन कंत्राटदारांवर मेहरबानी; RTI कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांच्याकडून चौकशीची मागणी

RTI activist Sudeep Tamhankar: दक्षता विभागाकडे तक्रार करून दोन खासगी कंत्राटदार आणि जलस्त्रोत खात्याचे अधिकारी यांच्यातील संगनमताची चौकशी करावी,अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली.
Water resources department awarded work to two private contractors without following procedures, RTI activist Sudeep Tamhankar alleges
Water resources department awarded work to two private contractors without following procedures, RTI activist Sudeep Tamhankar alleges Dainik Gomantak

Goa Water Resources Department: जलस्त्रोत खात्याने योग्य प्रक्रियेचे पालन न करता विविध कामे सोपवून दोन खासगी कंत्राटदारांवर विशिष्ट मेहरबानी दाखवल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे. दक्षता विभागाकडे तक्रार करून दोन खासगी कंत्राटदार आणि जलस्त्रोत खात्याचे अधिकारी यांच्यातील संगनमताची चौकशी करावी,अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली.

मंगळवारी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन खासगी कंत्राटदारांना योग्य प्रक्रियेचे पालन न करता हेतुपुरस्सर सरकारी बांधकामाचे कंत्राट दिले जात असल्याचा आरोप केला. केवळ मोठे कंत्राट मिळवण्यासाठी जलस्त्रोत खात्याने एका खासगी कंत्राटदाराला श्रेणी १ प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही ताम्हणकर यांनी केला. जलस्त्रोत खात्याची मेहरबानी असलेल्या खासगी कंत्राटदाराचा शासकीय विभागाच्या विविध बांधकामांत सहभाग असून त्याने सुरू केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे ताम्हणकर यांनी नमूद केले.

Water resources department awarded work to two private contractors without following procedures, RTI activist Sudeep Tamhankar alleges
Goa Tourism Department: पर्यटन खात्याचा महत्वाचा निर्णय! टुरिस्ट गाइडसाठी आता प्रमाणपत्र प्रशिक्षण अनिवार्य

‘त्या’अभियंत्याला पुन्हा मुदतवाढ?

ताम्हणकर पुढे म्हणाले की, एका वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्याची सेवा दोन वर्षांपर्यंत वाढवण्यात यश आले आहे. जलस्त्रोत विभागातील या वरिष्ठ अभियंत्याच्या सेवेत आणखी वाढ करण्याचा घाट सरकार घालत असल्याचा दावही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com