'मिका असो की मायकल; कायदा हा सर्वांना समान'

विश्वजीत राणेंकडून कारवाईचा पुनरुच्चार; विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचा दावा
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

पणजी : कायदा हा सर्वांना समान आहे. मग तो मिका सिंग असो किंवा मायकल लोबो असो. कायद्यासमोर सर्व सगळेच सारखे. गोव्यातील वारसा स्थळांचे, समुद्र किनाऱ्यांचे जतन केले जाईल. वारसा स्थळाच्या 100 मीटर आत कोणालाही बांधकाम करता येणार नाही. लोबो यांनी जे कारनामे केले आहेत ते विधानसभेत उघड केले जातील असेही राणे यांनी सांगितले.

गोव्यात सध्या कॉंग्रेसला काही अस्तित्वच नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधीपक्षनेते मायकल लोबो यांनी हा पक्ष विकत घेतला आहे. त्यामुळे मडगावचे आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यासारखे निष्ठावंत सुद्धा पक्षापासून दूर राहू पाहात आहेत, असा टोला विश्वजीत राणे यांनी लगावला आहे. कॉंग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून सत्तेबाहेर जास्त काळ ते राहू शकत नाहीत. मात्र आपण त्यांची नावे जाहीर करणार नाही, असेही राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane
झुआरी जमीन घोटाळा 50 हजार कोटी रुपयांचा

दरम्यान मडगावच्या एसजीपीडीए मासळी मार्केटमधील सोपो गोळा करण्याच्या कंत्राटाबाबतही त्यांनी भाष्य केलं. या विषयावर एसजीपीडीएचे चेअरमन आमदार दाजी साळकर यांच्याशी चर्चा केली असून हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असंही ते म्हणाले.

तसंच ज्या नगरपालिका आपला हिशोब व्यवस्थित देत नाहीत. ज्यांच्या हिशोबाचा ताळेबंद सादर केला जात नाही. त्या नगरपालिकांना कायद्यानुसार सरकारी अनुदान मिळत नाही. आपण या संदर्भात नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी बोलणार असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com