Goa Traffic Issue: गोव्यात वाहनधारकांकडून होतेय नियमांचे उल्लंघन

Goa Traffic Issue: मळ्यात वाहतूक कोंडी : सूचना फलकांकडे दुर्लक्ष करून अरूंद मार्गाचा वापर
Goa Traffic Issue
Goa Traffic Issue Dainik Gomantak

Goa Traffic Issue:

मळ्यात जुन्या पणजी-मडगाव रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनीसाठीचे चेंबर निर्मितीचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच चेंबर निर्मितीच्या कामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यामुळे सांताक्रुझकडे जाणाऱ्या वाहनांना पुलावरून वळून जावे म्हणून फलक लावण्यात आला आहे.

परंतु वाहतूक वळवल्याचे कोणी लक्षात न घेताच सरळ अरुंद मार्गावरून वाहनधारक पुढे जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत.

मलनिस्सारण चेंबरचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वाहतूक वळविल्याचा फलक कामाच्या शेजारी लावला आहे. खरेतर खड्ड्यांपासून अगोदर काही अंतरावर बॅरिगेट्स लावून तो फलक लावणे अपेक्षित आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घ्यायला हवी होती; पण तसे येथे काहीच केलेले दिसत नाही.

Goa Traffic Issue
Goa Congress: दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने कॅथोलिक उमेदवारच उभा करण्‍यासाठी दबाव

बेजबाबदारपणा नडतोय!

सध्या पणजीत वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. अशा वाहतूक कोंडीला काही प्रमाणात वाहनधारकही जबाबदार आहेत. १८ जून मार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चारचाकी पार्क केल्यानंतर त्या वाहनांच्या मागे अनेकजण वाहन पार्क करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

वाहनचालक गाडीत बसून राहून इतरजण खरेदी करताना किंवा इतर कामे करणारे काही कमी नाहीत. सांतिनेज परिसरात तर रस्ता खोदकाम केल्याने मधुबन सोसायटी, बांधाकडे किंवा ताळगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना बालभवनमार्गे जावे लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com