Crime News : आईशी लगट करण्याचा प्रयत्न फसल्यानेच मुलीवर राग; पोलिस तपास गतिमान

Crime News : वास्को लैंगिक अत्याचार प्रकरणातील विदारक सत्य उघड
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News :

वास्को, सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार केल्यानंतर साडेपाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याच्या प्रकरणामागील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत असून नराधमांनी सुडाच्या भावनेने या चिमुरडीची नृशंस पद्धतीने लैंगिक अत्याचार करून नंतर हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा पिता दाबोळी-वाडे येथील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याचे कुटुंबीय तसेच या इमारतीत बांधकाम करणारे काही मजूर तसेच रंगारी (पेंटर) हेही याच इमारतीच्या परिसरात शेडमध्ये राहतात.

या प्रकरणातील दोन्ही संशयित बिहार राज्यातील असून यातील एका आरोपीने काही दिवसांपूर्वी या मुलीच्या आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी त्या महिलेने त्यांचा प्रतिकार करत जोरात आरडाओरड केल्यामुळे तिचा पती (सुरक्षा रक्षक) धावत आपल्या खोलीकडे आला. त्यामुळे संशयिताचा हेतू फसला आणि त्याने तेथून पळ काढला. नेमकी हीच गोष्ट त्या मजुराला खटकत होती. या अपयशाचा वचपा काढण्यासाठी त्याने त्या जोडप्याची अवघी साडेपाच वर्षांची चिमुरडी हेरली.

ती मुलगी रात्री अधून मधून आपल्या पित्याकडे गेटवर खेळण्यासाठी म्हणून जायची. गुरुवारीही ती पित्यासोबत खेळण्यासाठी गेटवर गेली होती. मात्र, रात्री १२ वाजल्यावर सुरक्षा रक्षकाने तिला घरी जाऊन झोपायला सांगितले. गुरुवारी रात्री येथील काही कामगार इमारतीच्या तळमजल्यावर दारू पित बसले होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षक आपल्या खोलीवर आला असता, त्याला आपली मुलगी तेथे दिसून आली नाही. त्याने पत्नीला झोपेतून जागे करून मुलीविषयी विचारले असता, ‘ती तुमच्याकडे गेली होती’, असे तिने सांगितले. पण पित्याने

Crime News
British Citizen Arrest In Goa: टेरेसवर टोमॅटोसह गांजाची लागवड! गोव्यात ब्रिटीश नागरिकाला अटक

तिला १२ वाजता घराकडे पाठवल्याचे सांगितले. पण ती घरी नसल्याने त्यांचे धाबे दणाणले. मग त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली असता, तळमजल्यावर जेथे ते मजूर मद्य पिण्यासाठी बसले होते, त्याच ठिकाणी मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यांनी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केले.

आपल्या मुलीचा लैंगिक छळ करून नंतर तिची निर्दयीपणे हत्या केल्याची कैफियत तिच्या आईने पोलिसांसमोर मांडली. या दाम्पत्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा अज्ञातांवर नोंदविला होता.

दुसऱ्या दिवशी (शनिवारी) या इमारतीमध्ये काम करणाऱ्या २० कामगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्यापैकी दोघाजणांनी आपणच हे कृत्य केल्याची कबुली दिली. उपनेश कुमार आणि मुरारी कुमार अशी या दोघांची नावे असून ते मूळ बिहारचे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली.

मजुरांची होणार गावाकडेही चौकशी

या इमारतीमध्ये काम करणारे मजूर विविध राज्यांमधील असून त्यापैकी दोघांनी हे घृणास्पद कृत्य आपणच केल्याची कबुली दिली आहे.

मात्र, त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, याची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिस या मजुरांच्या गावीही चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com