Vasco Accident : मद्यधुंद चालकाने ४ मजुरांना चिरडले; चौघे जखमी, दोन गंभीर

Vasco Accident : वेर्णा येथील घटना; वेर्णा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘रोझ बर्गर’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी ही खासगी बस (जीए ०५ टी ४७७७) निघाली होती. तत्‍पूर्वी चालक भारत गोवेकर याने भरपूर दारू ढोसली होती. त्‍
Vasco Accident
Vasco Accident Dainik Gomantak

Vasco Accident :

वास्को, मद्यधुंद अवस्‍थेतील बसचालकाचा वळणावर वाहनावरील ताबा सुटला आणि बस सरळ रस्त्याच्‍या बाजूला उभारलेल्या तीन झोपड्यांमध्‍ये घुसली. या भीषण अपघातात ४ मजूर ठार झाले तर ४ गंभीर जखमी झाले. एकटा फोनवर बोलण्‍यासाठी बाहेर गेला म्‍हणून सुदैवाने बचावला.

काल शनिवारी रात्री साडेअकराच्‍या सुमारास वेर्णा औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली. ‘रोझ बर्गर’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती. बसचालक भारत श्रीधर गोवेकर (६१, रा. कुठ्ठाळी) याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. बसमधील कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘रोझ बर्गर’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यासाठी ही खासगी बस (जीए ०५ टी ४७७७) निघाली होती. तत्‍पूर्वी चालक भारत गोवेकर याने भरपूर दारू ढोसली होती. त्‍याच्‍या बेफिकीरपणामुळेच हा अपघात घडला. रात्री जेवण करून सर्व मजूर झोपी गेले होते. त्‍याचवेळी त्‍यांच्‍यावर काळाने झडप घातली.

बसखाली चिरडले गेल्‍याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला इस्पितळात नेताना मृत्यूने गाठले. तसेच जखमी झालेल्‍या चौघांपैकी दोघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहे. एकाला मडगाव जिल्‍हा इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे तर एकाला उपचार करून डिस्‍चार्ज देण्‍यात आला.

Vasco Accident
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

वेर्णा औद्योगिक वसाहतीत चेंबरचे काम करण्यासाठी हे नऊ बिहारी मजूर आले होते. कंत्राटदाराने तेथेच रस्त्याशेजारी तात्पुरत्या झोपड्या उभारून त्‍यांची राहण्‍याची सोय केली होती. रात्री जेवण करून हे लोक झोपले होते. त्‍याचवेळी सुसाट वेगाने झोपड्यांमध्‍ये घुसलेल्‍या बसने त्‍यांना चिरडले. पैकी रुबेंद्र नामक एक मजूर फोनवर बोलण्यासाठी झोपडीतून बाहेर गेला होता. त्यामुळे तो सुदैवाने बचावला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कंत्राटदार, सुपरवायझर, बसमालकावर होणार कारवाई

मजुरांना धोकादायक ठिकाणी झोपड्यांमध्ये वस्तीस ठेवलेला कंत्राटदार अब्दुल कदार (रा. फोंडा, मूळ केरळ), सुपरवायझर मेहबूब शेख आणि बसमालक नदीम शेख (कुर्टी-फोंडा) यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्‍यान, कंत्राटदाराला सरकार काळ्या यादीत टाकेल. यातून कोणीही सुटणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मृत व जखमी मजुरांची नावे

या अपघातात विनोद राजपूत (६०), राजेंद्र महतो (६०), रमेश मंडल (६०), अनिल महातो (३५) या चौघा मजुरांचा मृत्‍यू झाला. तर तुना कुमार (२२), दिनेश महतो (२५), सुरेश सिंग (२५), राजेश कुमार (२३) हे चौघे गंभीर जखमी झाले. त्‍यांच्‍यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

उन्‍मत्त बसचालकाची उद्दाम भाषा :

बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातानंतर बसचालकाला जाब विचारला असता ‘‘आणखी काही लोकांना मारून टाकणार’’ अशी उद्दाम भाषा त्‍याने बोलून दाखवली. या अपघाताची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसचालक भारत श्रीधर गोवेकर याला ताब्‍यात घेतले. अपघातात तोसुद्धा किरकोळ जखमी झाला असून, उपचारांसाठी त्‍याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

कुणाचीही गय नाही

वेर्णा येथे घडलेला अपघात दुःखद आहे. मद्यधुंद अवस्‍थेत बस चालवून चौघांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्‍या बस चालकावर कारवाई सुरू आहे. तसेच रस्‍त्‍यानजीक मजुरांना राहण्‍यास भाग पाडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. कुणाचीही गय करणार नाही.

घटनास्‍थळी भयानक चित्र

अपघातानंतर घटनास्‍थळाचे चित्र भयानक होते. बसने चिरडलेल्‍यांपैकी तिघा मजुरांनी जागीच दम तोडला होता. त्‍यांचे मृतदेह तेथे पडले होते, तर जखमी मजूर विव्‍हळत पडले होते. शेजारीच पीठ, तांदूळ आणि अन्‍य साहित्‍य विखुरून पडले होते.

फोनवर बोलण्‍यासाठी गेला, अन‌ बचावला! :

वेर्णा औद्योगिक वसाहतीत चेंबरचे काम करण्यासाठी आलेले नऊ बिहारी मजूर तेथे जवळच रस्त्याशेजारी तात्पुरत्या झोपड्या बांधून राहत आहेत. काल रात्री हे लोक जेवण करून आपल्‍या झोपड्यांमध्ये झोपले होते. या मजुरांपैकी एकटा रुबेंद्र नामक मजूर फोनवर बोलण्यासाठी झोपडीतून बाहेर गेला होता. त्यामुळे तो सुदैवाने बचावला. बसमधील कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.

Vasco Accident
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

आम्‍ही पोटासाठी गोव्‍यात आलो होता. पण क्षणार्धात होत्‍याचे नव्‍हते झाले. माझ्‍या डोळ्‍यांसमक्ष माझे सहकारी हे जग सोडून गेले. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना होती. मी पुरता हादरून गेलो आहे.

- रुबेंद्र, अपघातातून बचावलेला मजूर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com