Goa IIT: सांगेत आयआयटी होणार की नाही; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

''गोव्यात स्टार्टअप हब व कौशल्य विकास केंद्र उभारणार''
Goa IIT
Goa IITDainik Gomantak

गोवा राज्यात सांगे आयआयटीचा प्रश्न दोन्ही बाजुंनी धगधगत असल्याची स्थिती आहे. काही ग्रामपंचायती या प्रकल्पाच्या समर्थनात उतरल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींनी सांगे आयआयटीविरोधात ठराव केले आहेत. त्यामुळे या प्रस्तावाचा वाद कमी होण्याऐवजी तो वाढतच आहे. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गोव्यात आयआयटी गरजेचे म्हटले आहे.

(Union Minister Rajeev Chandrasekhar has said that IIT is necessary in Goa)

केंद्रीय राज्यमंत्री भाजप दक्षिण गोवा प्रभारी राजीव चंद्रशेखर हे सध्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दोन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. ते लोकप्रतिनिधी अन् कार्यकत्यांशी संवाद साधतायेत. यावेळी त्यांनी गोव्यात आयआयटी होणे गरजेचे आहे. निसर्ग व पर्यावरणाचा मान राखत कमी जागेत उभारणी शक्य होणार का? यावरही विचार सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सांगे नागरिकांसह विरोधी भुमिका असणारे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Goa IIT
Say No To Drugs: अमली पदार्थाविरुद्ध कारवाईचा वेग वाढणार; पोलिसांनी सुरु केली 'ही' मोहिम

गोव्यात स्टार्टअप हब व कौशल्य विकास केंद्र उभारणार

यावेळी बोलताना चंद्रशेखर म्हणाले की, गोव्यात स्टार्टअप हब व कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येतील. यामुळे स्थानिकांना नोकऱ्यांचा मुद्दा काहीसा निकालात निघणार आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आरोग्य क्षेत्रात करण्यात येईल. आणि केंद्र सरकारकडून राज्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Goa IIT
Goa Crime Cases: गोव्यात वाढली गुंडगिरी, पोलिसांचा धाक संपला का?

लोकसभा निवडणुक निकालावर बोलताना ते म्हणाले की, 2024 मधील लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकांपेक्षा भाजपला जास्त यश मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभा दक्षिण गोव्यासह देशभरात भाजपला अपेक्षित यश मिळणार असल्याचे ही ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह, भाजपचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com