जमीन हडप प्रकरणामुळे आसगाव चर्चेत!

Usurpation: युकेच्या गृहसचिव सुयेला ब्रेव्हरमन यांच्या आसगाव येथील जमीन हडप प्रकरणी एसआयटीने गुन्हा नोंदविला
Suella Braverman
Suella BravermanDainik Gomantak

Assagao: युकेच्या गृहसचिव सुयेला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांच्या आसगाव येथील वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित जमीन हडप प्रकरणात एसआयटीने गुन्हा नोंदविला असला तरी, हे प्रकरण इतर जमीन हडप प्रकरणासारखेच आहे की त्‍यास आणखी दुसरा कोन आहे? हा या प्रकरणाच्या तपासाचा खरा भाग असेल.

याआधी बार्देश तालुक्यातील, आसगाव पंचायत क्षेत्रात अशाच प्रकारे बेकायदेशीर व परस्पररित्या जमीनींचे खरेदी-व्रिकी व्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणांचा एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. याप्रकरणी सुयेला ब्रेव्हरमन यांचे वडील क्रिस्टी फर्नांडिस हे तक्रारदार असले तरी त्यांनी आपले भाऊ फा. आयरेस फर्नांडिस यांना मुखत्यारपत्र दिले होते, ज्याने नंतर या दोन मालमत्तेच्या विक्रीसाठी सदर अधिकाराचा वापर केला होता.

Suella Braverman
Toordal Scam in Goa : तूरडाळ प्रकरणात आणखी 6 जणांवर कारवाईचा बडगा

मात्र, आयरेस यांनी मालमत्ता विकल्याच्या एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर, क्रिस्टी यांनी सार्वजनिक नोटीसद्वारे संबंधित मुखत्यारपत्र रद्द केले आणि नंतर म्हापसा येथील स्थानिक न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. क्रिस्टी आणि त्यांच्‍या पत्नीने मे 1991 मध्ये आयरेसला जनरल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (General Power of Attorney) दिली होती. मार्च 2019 मध्ये क्रिस्टी यांनी ती रद्द केली. परंतु, रद्द करण्यापूर्वीच आयरेसने 2019 जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये या दोन्ही मालमत्तेची विक्री डीड पूर्ण केली होती.

Suella Braverman
Mapusa: नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांना धरले धारेवर

1. जमीन बळकावण्याच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केले आहे. त्यानुसार, क्रिस्टी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि डीजीपी जसपाल सिंग यांना पत्र लिहिले की, माझ्या नकळत एक इन्व्हेंटरी केस दाखल करण्यात आली आणि या प्रकरणात माझे प्रतिनिधित्व केले गेले होते, ज्याने माझा पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी असल्याचा दावा केला होता.

2. क्रिस्टी यांनी असाही दावा केला आहे की, त्यांना यूकेमधील त्यांच्या निवासी पत्त्यावर कोणतीही नोटीस बजावली नाही. फसवणूक करणाऱ्यांनी मला कोणतीही माहिती किंवा विश्वासात न घेताच, परस्पर मालमत्ता हडप करुन विकली आहे.

3. हा प्रकार माझ्या वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीचा व्यवहार दाखल करण्यापूर्वी आणि इन्व्हेंटरीची कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वी केला होता, असेही क्रिस्टी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर, एसआयटीने याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंसंच्या कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com