Mapusa: नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांना धरले धारेवर

Mapusa Municipality: कचरा संकलन कंत्राटदाराला परस्पर मुदतवाढ दिल्याच्या आरोप..
Mapusa Municipality
Mapusa MunicipalityDainik Gomantak

Mapusa Municipality: पालिका मंडळाला विश्वासात न घेता, कचरा संकलन कंत्राटदाराला परस्पर मुदतवाढ दिल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी गटासह सर्व नगरसेवकांनी काल म्हापसा नगराध्यक्षांना धारेवर धरले. विचारविनिमय केल्यानंतर पालिका मंडळाने 13 सप्टेंबरपासून कचरा संकलन कंत्राटदाराला एक महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

काल सोमवारी सकाळी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची सर्वसाधारण बैठक पालिकेच्या सभागृहात झाली. बैठकीतील वादाला सुरवात नगरसेवक प्रकाश भिवशेट तसेच नगराध्यक्षांमध्ये गत बैठकीतील तयार केलेल्या अहवालावरून झाली. अहवाल व्यवस्थित तयार केला जात नसल्याचा आरोप भिवशेट यांनी केला.

Mapusa Municipality
IIT Goa : सांगेत आयआयटी होणारच!; मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

म्हापसा पालिकेकडून प्रभाग 1 ते 10 मधील, कचरा गोळा करण्याचे काम खासगी कंत्राटदारामार्फत केले जाते. कंत्राटदाराला दिलेली मुदत संपुष्टात आल्याने नगराध्यक्षांनी त्याला 10 लाख रुपयांच्या अतिरिक्त रक्कमेवर मुदत वाढ दिली. या मुदतीस सत्ताधारी गटातील नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी हस्तक्षेप घेतला. एवढ्या मोठ्या रक्कमेची मुदतवाढ ही पालिका मंडळाला विश्वासात न घेतल्याबद्दल त्यांनी यावर हरकत घेतली. तसेच नगरसेवक स्वप्नील शिरोडकर यांनी देखील ही मुदतवाढ रद्द करण्याची मागणी केली.

कंत्राटदाराकडूनच सोपो गोळा: चतुर्थीच्या काळात बाजारातील सोपोच्या मुद्द्यावरूनही चर्चा रंगली. गेल्या महिन्यात मंडळाच्या विशेष बैठकीत चतुर्थीतील सोपो मंडळाकडून गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र प्रत्यक्षात कंत्राटदाराकडूनच सोपो गोळा केल्याने साईनाथ राऊळा यांनी हरकत घेतली.

Mapusa Municipality
Goa Rain Updates : गोव्यात पाच दिवस जोरदार पाऊस; 16 सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’

चर्चेनंतर प्रभाग 1 ते 10 मधील कचरा कंत्राटादाराला 13 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. तसेच वाढीव कालावधीपूर्वी कंत्राटदाराने कचर्‍याचे संकलन केलेल्या कालावधीसाठी पालिका निधीतून कंत्राटदाराला देय देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मतदानाने मंजूर करण्यात आला असून, 4 नगरसेवकांनी त्यास विरोध केला.

शुभांगी वायंगणकर, नगराध्यक्षा, म्हापसा पालिका

चतुर्थीमुळे बैठक बोलावणे शक्य नसल्याने कंत्राटदाराला मुदतवाढ देणे भाग पडले. ही वाढ दिली नसती, तर शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असती. शेवटी तोडगा काढण्यासाठीच मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. तसेच नवे कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com