Goa Taxi: प्रवासी असल्याच्या बहाण्याने दोघांचा टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला; कारही नेली चोरून...

पणजी पोलिसांत गुन्हा नोंद
Goa Taxi
Goa Taxi Dainik Gomantak

Goa Taxi: गोव्यात टॅक्सी चालकावर हल्ला करून त्याला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. अँटिनियो रॉड्रिग्ज असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. तो मूळचा मोडेवाडा, मुळे, सासष्टी येथील आहे. याबाबत पणजी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, रॉड्रिग्ज यांच्याकडे दोघा अज्ञात व्यक्तींनी प्रवासी असल्याचे भासवून टॅक्सीची चौकशी केली. रॉड्रिग्ज हे संबंधितांना निर्धारित स्थळी सोडण्यास तयार झाले. रॉड्रिग्ज यांच्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे. तीच कार ते टॅक्सी म्हणून चालवतात. त्यांच्या टॅक्सीत बसलेल्या दोघा अज्ञात प्रवाशांनी नंतर रॉड्रिग्ज यांना दमदाटी करत त्यांची लुबाडणूक केली. तसेच त्यांची कार घेऊन दोघेही पसार झाले, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला आहे. याबाबत पणजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com