Michael Douglas: सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा खूप मोठा सन्मान: ग्लोबल लिजेंड मायकेल डग्लस

54 व्या इफ्फी च्या समारोप समारंभात मंगळवारी मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Michael Douglas
Michael Douglas

Satyajit Ray Lifetime Achievement Award To Michael Douglas: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे, असे दिग्गज हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माता मायकेल डग्लस यांनी आज गोव्यामध्ये आयोजित इफ्फी 54 मध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

54 व्या इफ्फी च्या समारोप समारंभात मंगळवारी मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपट उद्योगासाठी हा सर्वोत्तम काळ आहे, आणि इफ्फी 54 मध्ये 78 हून अधिक जगभरातील देश सहभागी होत आहेत हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. “भारतीय चित्रपट जगभर प्रसिद्ध आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” असे डग्लस म्हणाले.

चित्रपट समान भाषेची देवाण घेवाण करतात आणि आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतात. चित्रपटांमध्ये काय चालले आहे हे जगभरातील प्रेक्षक समजू शकतात. चित्रपट आंतरराष्ट्रीय संपर्क निर्माण करतात. हीच या उद्योगाची जादू, सौंदर्य आणि आनंद आहे आणि म्हणूनच मला हा व्यवसाय खूप आवडतो, असे डग्लस म्हणाले.

दोन वेळा अकादमी पुरस्कार विजेते मायकेल डग्लस म्हणाले, प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी विशेष गोष्ट आहे, असे डग्लस म्हणाले.

“रे यांचे चित्रपट खूप मनोरंजक होते आणि त्यांनी वास्तवाचे चित्रण केले. रे यांचे मोठेपण हे आहे की ते एकाच वेळी केवळ दिग्दर्शकच नव्हते तर लेखक, चित्रपट संपादक, आणि संगीतकारही होते,” असे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com