राज्यात आणखी तिघांचा मृत्यू

1
1


पणजी

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाबतचा धोका वाढतच चालला आहे. शनिवारी राज्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजवर राज्यात मृत्यू झालेल्या कोरोमुळे मृतांची संध्या ४८ झाली आहे. आजच्या दिवशी २८० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. २२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात असणाऱ्या सक्रिय कोरोनाग्रस्ताची संख्या सध्या १७०७ इतकी आहे.
आज ज्या कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये बेती येथील ७७ वर्षीय पुरुष, आके, मडगाव येथील ६४ वर्षीय पुरुष आणि एका ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान हे तिन्ही रुग्ण कोव्हीड पॉझिटिव्ह असले तरी त्यांच्या आरोग्याची स्थिती अत्यन्त नाजूक प्रकारची होती, अशी माहिती यावेळी मिळाली.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २९६० जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ५८ जणांना ठेवण्यात आले. १५१२ जनांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले तर २५७१ जणांचे अहवाल हाती आहेत.
ट्रेन, विमान आणि रस्तामार्गे आलेले ३३ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात ६ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ३२ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात १५ रुग्ण, वाळपई आरोग्य केंद्रात ३० रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ५९ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ८० रुग्ण, बेतकी आरोग्य केंद्रात १३ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ३६ रुग्ण, कोलवाळ आरोग्य केंद्रात २७ रुग्ण, खोर्ली आरोग्य केंद्रात १३ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ८७ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात ३४ रुग्ण, कुडचडे आरोग्य केंद्रात १९ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात ३ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात ११० रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ३९० रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ३४ रुग्ण, मेरशी आरोग्य केंद्रात १९ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात १७ रुग्ण, शिरोडा आरोग्य केंद्रात ११ रुग्ण, धारबांदोडा आरोग्य केंद्रात १९ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात ८९ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ३१ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com