नावेलीत पार्क केलेल्या गाडीतून विदेशी चलनासह 50 हजार रुपयांची चोरी; दवर्लीतील एकाला अटक

मडगाव पोलिसांनी दवर्ली येथील रियाज समीर शेख याला अटक केली आहे.
Navelim Theft Case
Navelim Theft CaseDainik Gomantak

Navelim Theft Case: गोव्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकार आणि गोवा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यामध्ये प्रामुख्याने चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नावेली येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

Navelim Theft Case
Goa Assembly Monsoon Session 2023 : 'फ्रॉड' शब्दावरुन मंत्री राणेंची माघार; व्यक्त केली दिलगीरी

नावेलीत पार्क केलेल्या स्कूटरच्या डिकीतून विदेशी चलनासह 50 हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी दवर्ली येथील रियाज समीर शेख याला अटक केली आहे.

संशयित गुन्हेगार कोणत्या टोळीचा भाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वेर्णा येथे दोन शोरूम फोडल्याची घटना उघडकीस आली होती. दोन्ही शोरूममधून तीन लाखांहून अधिक रक्कमेची चोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com