Theater Day : कलाकारांचा सत्कार ही पावती : शेटगावकर

Pernem News : रंगभूमी दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ कलाकारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
Pernem News
Pernem News Dainik Gomantak

Theater Day : पेडणे, रंगभूमीच्या उत्कर्षासाठी ज्यांनी चार ते पाच दशकाहून अधिक काळ आपले तन मन धन खर्ची घालून रंगभूमी जिवंत ठेवण्यास हातभार लावला, अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची पावती सम्राट क्लब टाऊन पेडणे यांनी दिली आहे, असे उद्‍गार पेडणे येथे आयोजित राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त, आदर्श शिक्षक तथा हभप. विष्णु बुवा शेटगावकर यांनी काढले.

रंगभूमी दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ कलाकारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी पाच ज्येष्ठ कलाकाराबरोबर दोन दिवंगत रंगकर्मींचा सन्मान प्रमुख अतिथी व्ही.जी. शेटगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

यामध्ये कै. श्रीकृष्ण आरोसकर.कै.दिलीप मांद्रेकर यांचा मरणोत्तर तर सुरेश बांदेकर, प्रभाकर गावकर, विलास परब, नारायण परब आणि मुरारी म्हामल उर्फ तातो पाडजी यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर सम्राट क्लब टाऊन पेडणेच्या अध्यक्षा सम्राट प्रिया टांकसाळी, माजी अध्यक्ष सुभाष पार्सेकर, संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश नाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Pernem News
Pernem News : सर्व पतसंस्थांनी अंत्योदय तत्त्वावर पतपुरवठा करावा : मंत्री श्रीपाद नाईक

सुरेखा किनळेकरने सादर केलेल्या एकपात्री नाट्यप्रवेशाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रिया टांकसाळी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन स्मिता पुनाजी यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय पुंडलिक पंडित, साईनाथ देसाई, बिंदिया गावस, नवसो परब, दत्ताराम मोपकर, शांती किनळेकर, अभिजीत पार्सेकर यांनी करून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com