Goa Fire News : आगीचा भडका; 24 तासांत अग्निशामक दलाला 79 कॉल

70 कॉल हे आगीच्या घटनांचे, तर 9 कॉल तत्काळ (इमर्जन्सीचे)
Goa Fire News
Goa Fire NewsDainik Gomantak

Goa Fire News : राज्यात सध्या आगीच्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहेत. मागील 24 तासांत अग्निशामक दलाकडे एकूण 79 कॉल आले. त्यापैकी 70 कॉल हे आगीच्या घटनांचे, तर 9 कॉल तत्काळ (इमर्जन्सी) असल्याचे नोंदवले गेले.

Goa Fire News
I-League Football: चर्चिल ब्रदर्सला ऐजॉल एफसीने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले

फेब्रुवारी 17 ते 3 मार्च या 15 दिवसांत 520 कॉल आले असून, त्यापैकी 423 आगीचे, 96 तत्काळ कॉल तर एक कॉल अवांतर म्हणून नोंदवला आहे. घरे, दुकाने, आस्थापने, वनक्षेत्र, डोंगर किंवा काजू बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.

गेल्या 24 तासांमधील आगीच्या दुर्घटनांमध्ये 2 लाख 5 हजारांची मालमत्ता भस्मसात झाली असून, 7 लाख 70 हजारांची मालमत्ता अग्निशमन दलाने वाचविली. गेल्या पंधरा दिवसांत 31 लाख 4 हजार 725 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर 1 कोटी 7 लाख 90 हजारांची मालमत्ता वाचविल्याची नोंद आहे.

अग्निशामक दलाकडे जे कॉल आले, त्यात उत्तर क्षेत्रातून 43 टक्के, दक्षिण क्षेत्रातून 23 टक्के आणि मध्य क्षेत्रातून 34 टक्के असे प्रमाण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com